स्मृतिगंध – अलविदा प्रदीप सरकार

प्रा. अनिल कवठेकर

चित्रपटसृष्टीत स्वतच्या प्रतिभेने स्वताचे एक विलक्षण वेगळे स्थान निर्माण करणारे फार कमी दिग्दर्शक आहेत. त्या दिग्दर्शकांमध्ये ज्यांचे मानाने आणि सन्मानाने नाव घेता येईल असे लेखक- दिग्दर्शक प्रदीप सरकार हे होय.  परिणता, मर्दानी, हेलिकॉप्टर इला, लफंगे परिंदे, लागा चुनरी मे दाग, डब्बा गुल ही त्यांनी दिग्दर्शित केलेले काही चित्रपट आहेत. एखाद्या दिग्दर्शकाचे वेगळेपण जे असते ते इथून सुरु होते. त्यांच्या चित्रपटाचे शीर्षक पाहिल्यानंतर त्या चित्रपटात नेमके काय असणार आहे याचा कसलाही अंदाज येत नाही. प्रदीप सरकार यांच्या चित्रपटाच्या शीर्षकांची यादीच हे खूप वेगळे रसायन असल्याचे आपल्याला सांगते. म्हणजे आपण थोडा वेळ विचार करत बसू की,  ‘हेलिकॉप्टर इला’ मध्ये नेमके काय दाखवणार?  हेलिकॉप्टर  दाखवणार की इला दाखवणार? विदू विनोद चोपडा यांचा ‘परिंदा’ येऊन गेलेला आहे. मग हा ‘लफंगे परिंदे’ वेगळी कॉन्सेप्ट घेऊन येणारा चित्रपट कसा असणार आहे. लफंगे हा शब्द मुळातच वाया गेलेल्या तरुणांसाठी वापरला जातो पण तो जेव्हा परिंदेसाठी वापरला जातो तेव्हा हे कसले परिंदे आहेत आणि ते लफंगे कसे  असे प्रश्न निर्माण होतातच. ‘लागा चुनरी मे दाग’ यात ‘दाग’मागे खूप काही विलक्षण भावना आहे. संस्कृत आहे. तश कथाही आहे. तसेच एक जुने गाणेही आहे. तेव्हा एखाद्या भजनामधली ओळ चित्रपटाचे शीर्षक म्हणून घेण्यामागे प्रदीपजी यांना नेमके काय सुचवायचे आहे. ‘डब्बा गुल’ हा चित्रपटही असाच. या सगळ्या चित्रपटाच्या शीर्षकावरून प्रदीप सरकार आपल्या चित्रपटातून जे काही मांडणार आहेत ते जबरदस्त असणार आहे. चित्रपटाची भाषा ज्याला पूर्णपणे कळलेली आहे, अशी माणसे त्यांच्या कथेच जी काही वेगळ्या पद्धतने मांडणी करतात तेव्हा तो एक वेगळा अनुभव प्रेक्षकांना देतात. त्यापैकी एक म्हणजे प्रदीप सरकार होय.

अनेक अॅड फिल्म्सनंतर वयाच्या 55 व्या वर्षी बेस्ट डेब्युटंट डायरेक्टर म्हणून पुरस्कार घेताना गंमत वाटते असे शांत, मिश्किलपणे म्हणणारा माणूस म्हणजे प्रदीप सरकार! त्यांच्या अनेक जाहिरात पाहिल्यानंतर असे लक्षात येते की जाहिरात मांडताना 90च्या जाहिरातीमध्ये निवेदनासाठी त्यांनी पुरुष आवाज वापरलेला आहे आणि अगदी तसाच ‘परिणता’मध्ये. कथा नेमकी काय आहे आणि कुठे घडते आहे हे सांगण्यासाठी त्यांनी पुरुषी आवाजाचा वापर केलेला आहे. हे निवेदन म्हणजे  सुंदर कविता आहे.

रिक्षों का, ट्रामों का,
कॉफी हाऊस की शामो का शहर

परिवर्तनकी प्यासका, कालीवाडीके विश्वास का

रसगुल्ले की मिठास का,
पुचके के तीखे एहसास का

फुटबॉल की उछाल का, अड्डे की बहस का

सियासत की तहस नहस का शहर

प्रदीप सरकार ज्या पद्धतनी आपल्या चित्रपटाची फ्रेम निवडतात. त्याच पद्धतीने ते संवादातील शब्दांकडेही खूप जाणीवपूर्वक लक्ष देतात. ओळखीचे असूनही त्या क्षणाला  ते शब्द नवीन वाटतात. ताजे वाटतात. अर्थपूर्ण वाटतात आणि आपल्या मनाचा ताबा घेतात. त्यांच्या हृदयातून साकारलेली अप्रतिम  कलाकृत म्हणजे ‘परिणता’  जो साठच्या दशकातल्या सुखद रमणीय आठवणींच्या प्रदेशात सहजपणे घेऊन जातो. ‘परिणीता’ पहिल्या दहा मिनिटातच विचार करायला भाग पाडतो. संवादातील नैसर्गिकता, अभिनयातील सहजता स्पष्टपणे प्रत्येक प्रेममध्ये दिसते आणि हीच मांडणी सरकार यांची खासियत.

चित्रपटाइतकीच त्यांच जाहिरातीवर आणि त्यांच्या सादरीकरणावर जबरदस्त पकड होती. प्रत्येक जाहिरातीमध्ये सौंदर्याचा, श्रीमंतचा, विचारांच्या उंचचा थाट ते सहजपणे मांडत असत.  एखाद्या वस्तूची जाहिरात पाहताना त वस्तू वापरण्याची मानसिकता सहजपणे निर्माण होईल अशा रचना ते करत.  त्यांच्या जाहिरातमध्ये  अतिशय भावपूर्ण, अर्थपूर्ण कविता आहेत.

जब ममता की आंच पर मुस्काने खिलती है

जब खुशियों के दरवाजे  बेझिझक खुलते है

जब तस्वीरो के रंग जिंदा हो जाते है

 जब कुछ खास लम्हे हमेशा साथ रहते है

जब कोमलता पर कभी कोई आंच नही आती

हवा सिर्फ लहराती नही महफूज भी रखती है

आणि शेवटी उत्पादन विकणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कंपनीचे नाव समोर येते. किती वेगळ्या पद्धतीने त्यांनी या जाहिरातीला शब्दांच्या सौंदर्याच्या आणि अर्थपूर्णतेच्या भावविश्वात बसवले आहे. यालाच  हाडाचा दिग्दर्शक म्हणतात जो लेखकसुद्धा होता. दुसरी जाहिरात बाथरूमची आहे आणि आत्तापर्यंत बाथरूमवर कोणी कविता लिहिल्याचे ऐकिवात नाही. बऱ्याचजणांना मुक्तपणे आनंद देणारे ठिकाण म्हणजे बाथरूम आणि हेच दिग्दर्शकाने नेमकेपणाने पकडले आणि ते कवितेमध्ये मांडले.

आपनासा वो कोना  अच्छा लगे जहाँ खोना

खुश का एक मौका या डान्सिंग का हो चौका

मूड हो थोडा नॉटी कभ थोडा, थोडा रोना

अपना सा वो कोना

अशा एका अत्यंत प्रतिभावंत दिग्दर्शक आणि लेखकाच्या नवनिर्मितच्या सादरीकरणाचा अनुभव घ्यायला आपल्याला आता मिळणार नाही. चित्रपटातील सौंदर्याचा आस्वाद घेणाऱ्या रसिकांचे प्रदीप सरकार यांच्या जाण्याने मोठे नुकसान झालेले आहे. त्यांनी केलेली निर्मिती आपल्याला नवा दृष्टिकोन, नवी प्रगल्भता देत राहील. प्रदीप सरकार यांच्या या चित्रमय व अप्रतिम लेखन-दिग्दर्शनाला मानाचा मुजरा.

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)