खाण्यासाठी जन्म आपुला…

प्रसाद खांडेकर म्हणजे घराघरात पोहोचलेला लोकप्रिय चेहरा. ते अष्टपैलू अभिनेते आहेत. त्यांची कॉमेडी म्हणजे भन्नाट. ते सध्या ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कॉमेडी शोमध्ये काम करत आहेत. त्यांनी बऱयाच नाटकांत काम केले आहे. एक अभिनेता असण्याबरोबरच ते चांगले लेखक आहेत. खवय्ये असलेले प्रसाद ‘‘खाण्यासाठी जन्म आपुला’’ असं सांगायला विसरत नाहीत.

प्रसाद खूप फुडी आहेत. ते स्वतःला ‘खाद्यप्रेमी’ म्हणवतात. पाणीपुरी त्यांचे ऑलटाइम फेवरेट स्थानिक स्ट्रीट फूड. पाणीपुरीला ते कधीच पंटाळत नाहीत. प्रसादला आईच्या हातची पुरणपोळी, पिठीभात आणि मोदक फारच प्रिय आहेत. प्रसादची पत्नीही उत्तम स्वयंपाक करते. तिचा स्वतःचा बेकरी ब्रँडसुद्धा आहे. ‘स्वीट मेमोरियस’ असे त्याचे नाव आहे. त्या खमण, खांडवी असे बरेच गुजराती पदार्थ छान बनवतात.

शूटिंगमुळे बऱयाच ठिकाणचे दौरे सुरू असतात. एकदा प्रसाद लंडनला गेले होते. तिकडचे जेवण त्यांना फार काही आवडले नाही. त्यांनी देशी खाणे मिस केले. कधी कधी मूड आला की, प्रसाद कुकिंग करतात. सँडविच, केक वगैरे. प्रसाद म्हणाले, लॉकडाऊनच्या वेळी सगळे काही ट्राय केले. जसे जेवण बनवणे, वेगन डाएट फॉलो करणे वगैरे, जे आपण सर्वांनी करण्याचा प्रयत्न केला तसा त्यांनीही केला. त्यांना चहा आणि कॉफी ही दोन्ही पेये खूप आवडतात, पण जर ते नीट जमले नाही, तर मात्र त्यांचा मूड खराब होतो. प्रसादचे म्हणणे आहे की, खाण्यासाठी आपला जन्म असतो. खात रहा, त्तसेच तब्येतीची काळजी घ्या. त्यामुळे आपल्याला खाद्यपदार्थाचे विविध पर्याय मिळतात, तसेच खूप नवीन गोष्टी ‘ट्राय’ करता येतील, असेही ते सांगायला विसरत नाहीत.

मॅगी-पकोडाची आठवण

प्रसादला मस्त तेलात तळलेली कोळंबी आवडते. चायनीज आणि थाई हे त्यांचे आवडते क्युसिन आहे. क्रीम ऑफ मशरूम सूप आणि ग्रीन थाई करीची चव चाखायलाच हवी. शूटिंगसाठी एकदा हिमाचल प्रदेश आणि कश्मीरला जाण्याचा योग आला होता. तिथे 20 ते 25 दिवस नुसतं मॅगी आणि पनीर पकोडाच खाल्ला होता, अशा आठवणी प्रसाद सांगतात.

– मृदा झरेकर, डहाणूकर कॉलेज