लेख : ठसा : राम जेठमलानी

2530

राम जेठमलानी म्हणजे कुशाग्र बुद्धिमत्ता, प्रचंड व्यासंग असलेले, पण तेवढेच वादग्रस्त आणि आयुष्याच्या अखेरच्या काळापर्यंत चर्चेत राहिलेले व्यक्तिमत्त्व. वास्तविक ते देशातील सर्वोत्कृष्ट विधिज्ञांपैकी एक होते. वयाच्या 17 व्या वर्षापासून अगदी नव्वदीत प्रवेश केल्यावरही त्याच तडफेनेहाय प्रोफाईलकेसेस लढणाऱ्या राम जेठमलानींनी त्यांना जे वाटले तेच केले. त्यातून उद्भवलेल्या वादविवादांची, परिणामांची पर्वा त्यांनी कधीच केली नाही. वादविवादांचे त्यांना कधीच वावडे नव्हते. मात्र एकनिर्णायकवकील अशी त्यांची प्रतिमा असल्याने अनेक विवादांनंतरही विधी आणि राजकीय वर्तुळातील त्यांचा दबदबा कायम राहिला

ब्रिटिश राजवटीतील सिंध प्रांतातील शिकारपूर येथे 1923 मध्ये जन्मलेल्या राम जेठमलानी यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची चमक शालेय जीवनापासूनच दिसली. शाळेत शिकत असताना बढती मिळवत तेराव्या वर्षीच ते मॅट्रिक उत्तीर्ण झाले. त्या काळी सर्वसाधारणपणे वयाच्या 21 व्या वर्षी लोक वकील बनत, पण राम जेठमलानींनी 17 व्या वर्षीच वकिलीचाकोटअंगावर चढवला. फाळणीनंतर तेस्थलांतरितम्हणून मुंबईत आले आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनाची नव्याने सुरुवात केली. येथील शासकीय विधी महाविद्यालयात त्यांनी अध्यापनाचे काम केले. पुढे वकिलीही सुरू केली. अर्थात, ते प्रथम प्रसिद्धीच्या झोतात आले ते 1959 मध्ये के.एम. नानावटी विरुद्ध महाराष्ट्र सरकार या खटल्यात. के. एम. नानावटी हे नौदलप्रमुख होते. पत्नीच्या प्रियकराच्या खूनप्रकरणी ते तुरुंगात होते. त्यांनी स्वतःही खून केल्याची कबुली दिली होती. मात्र राम जेठमलानी यांनी त्यांचा खटला लढवला आणि नानावटींची सुटका केली होती. याच खटल्याने राम जेठमलानी यांना धडाडीचेक्रिमिनल लॉयरम्हणून देशभरात प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर त्यांचा विधिज्ञ म्हणून दबदबा वाढतच गेला. देशातीलहाय प्रोफाइलआणि सर्वोत्कृष्ट विधिज्ञांपैकी एक म्हणून त्यांची गणना होऊ लागली. अर्थात त्याच वेळी त्यांच्या बेधडक स्वभावामुळे त्यांनी अनेक वादग्रस्त लोकांचीही वकीलपत्रे घेतली. त्यामुळे जनमानसात त्यांची एक नकारात्मक प्रतिमाही तयार झाली

नानावटी खटल्यातील यशाने त्यांचे नाव मोठे झाल्यानंतर त्यांनी कुख्यात तस्कर हाजी मस्तान याची वकिली केली. साहजिकच त्यांच्यावरतस्करांचा वकीलअशी टीकाही झाली. त्यांची ही वादग्रस्त वकिलीची परंपरा पुढेही कायम राहिली. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांचा बचाव, राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची मांडलेली बाजू, नरसिंह राव सरकारच्या काळात गाजलेल्या लाच प्रकरणातील आरोपी हर्षद मेहता आणि शेअर बाजार घोटाळय़ातील आरोपी केतन पारेख यांची लढवलेली केस, जेसिका लाल हत्या प्रकरणात आरोपी मनू शर्माचा बचाव, लालू प्रसाद यादव यांची चारा घोटाळा प्रकरणात केलेली वकिलीत्यांच्या वादग्रस्त खटल्यांची लांबी खूप मोठी आहे. त्यावरून वेळोवेळी ते टीकेचे धनीही झाले, पणमी वकील म्हणून कर्तव्य बजावत होतोअसा स्वतःचा बचाव करीत त्यांनी या वादंगांची, टीकेची कधीच पर्वा केली नाही. संसद हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी अफझल गुरू याचा बचाव त्यांनी हाच युक्तिवाद करीत केला. अर्थात पुढे त्यांनी या वकीलपत्राचा इन्कारही केला होता. खरे म्हणजे राम जेठमलानी यांनी अनेक खटले मोफतदेखील लढवले. त्यांच्या आक्रमक आणि बेधडक व्यक्तिमत्त्वाला एक नर्मविनोदी, मिश्कील स्वभावाचा पैलूही होता. पण या गोष्टी त्यांच्या वादविवादांमुळे झाकोळल्या गेल्या

वकिली व्यवसायात कायम चढती कमान राहिलेल्या राम जेठमलानींचे राजकीय आयुष्य मात्र चढउतारांचे राहिले. आणीबाणीच्या काळात त्यांनी इंदिरा गांधींवर प्रचंड टीका केली. ते आणीबाणीविरोधकांचा एक आवाज बनले होते. मात्र अटक टाळण्यासाठी ते कॅनडात गेले आणि 1977 मध्ये तेथूनच त्यांनी मुंबईतील त्यावेळच्या उत्तरपश्चिम मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. 1980 मध्येही ते जिंकले, पण 1985 मध्ये पराभूत झाले. पुढे 1988 मध्ये प्रथम ते राज्यसभेवर गेले. नंतर वाजपेयी सरकारमध्ये ते कायदामंत्री झाले. मात्र वादग्रस्त विधानांमुळे त्यांना वाजपेयींनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास सांगितले. पुढे जेठमलानी यांनी वाजपेयींविरोधात लखनऊमधून अपक्ष म्हणून निवडणूकही लढवली. काही काळानंतर पक्षशिस्तीचा बडगा म्हणून त्यांना भाजपमधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. अर्थात 2010 मध्ये ते पुन्हा स्वगृही परतले आणि राज्यसभेवर गेले. पंतप्रधान मोदी यांची बाजू घेणाऱ्या जेठमलानी यांनी नंतर त्यांच्यावरही कठोर टीका केली. शिवसेनाप्रमुखांशी त्यांचे नेहमीच जिव्हाळय़ाचे संबंध राहिले. शिवसेनेच्याच पाठिंब्यावर ते एकदा राज्यसभेवर गेले होते. वकिली असो की राजकारण, परिणामांची पर्वा करता, वादविवाद अंगावर झेलत राम जेठमलानी त्यांच्या इच्छेप्रमाणे बोलत आणि वागत राहिले. कोणाचीही भीती बाळगता मनातील विचार सुस्पष्टपणे मांडणे आणि त्यानुसार वागणे हा त्यांचा स्थायिभावच होता. त्यातून अनेक वादंग जरूर निर्माण झाले, पण त्यामुळे कायदा आणि संसदीय क्षेत्रातील त्यांचे योगदान कमी होत नाही. ‘कायदेपंडितहे त्यांचे स्थान आणि महत्त्व कमी झाले नाही. आता ते काळाच्या पडद्याआड गेले असले तरीराम जेठमलानीनावाचा एक दबदबा देशाच्या कायदा आणि राजकीय क्षेत्रात सलग सातआठ दशके कायम होता याची नोंद इतिहासात कायम राहील.

आपली प्रतिक्रिया द्या