श्रीनामदेव महाराज चव्हाण, कोल्हापूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या श्रीनामदेव महाराज चव्हाण नामक व्रतस्थ सिद्धसत्पुरुषाच्या अवतारकार्याचा हा अल्पपरिचय

श्री नागलिंगय्या शिवयोगींकडून स्पष्ट संकेत प्राप्त झाले तेव्हा पुढील वाट सद्गुरूच दाखवतील या श्रद्धेपोटी नामदेव निश्चिंत राहिले. दरम्यान वडील व्यंकोबा यांच्या निधनामुळे नामदेवांकडे लक्ष देणारे घरात पुणी शिल्लक राहिले नाही. वडिलांनी देह ठेवण्यापूर्वीच धाकटय़ा लेकीचा विवाह करवून दिल्याने नामदेवांवर कसलीही जबाबदारी राहिली नव्हती. वडिलांचा धंद्यात जम बसलेला होता. बऱयापैकी सुबत्ताही होती. घर आणि धंद्याची जबाबदारी नामदेवांवर होती. दरम्यान मोठी बहीण भागूताई हिचे यजमानही कोल्हापुरास स्थायिक झाले. पंत्राटी कामासोबत त्यांचा सावकारीचा जोडधंदाही होता. या उभयतांनी नामदेवांना आधार दिला. मात्र नामदेव एपूणच उदासीनता बाळगून होते.

पुढे परिस्थिती बदलली. भागूबाईंचे पती निधन पावले. पदरी मूलबाळ नसल्यामुळे भागूबाईंसाठी नामदेव हाच काय तो एकमेव आधार होता. तेव्हा भागूबाईंनी दत्तक विधान करून नामदेवांना आपल्यापाशी आणले. शेती, सावकारीचा धंदा, पैसा-अडका, बांधकामाची पंत्राटे यांच्या रूपाने अंगावर अवचितपणे आलेली जबाबदारी पेलण्यात नामदेवांचा बराच वेळ खर्ची होऊ लागला. त्यांनी बहिणीचा प्रपंच विश्वस्त या नात्याने सांभाळला. याच काळात, वाढत्या वयाचे नामदेव दररोज 500 जोर-बैठका काढून पैलवानागत झाले. काही वर्षातच वयाची 22 वर्षे पूर्ण झाली तेव्हा भागूबाईंनी सुयोग्य स्थळ पाहून नामदेवाचे लग्न लावले आणि त्यास संसार थाटून दिला.

बेळगावच्या जगताप घराण्यातील गोरीपान, सुदृढ गंगा चव्हाणांची सून झाली अन् सासरचा उंबरठा ओलांडून गृहप्रवेश करती झाली. नामदेव आता ‘नामदेवराव’ झाले, गृहस्थाश्रमी होऊन प्रपंचाचा गाडा हापू लागले. दिवसांमागून दिवस चालले होते. नामदेव आपला आणि बहिणीचा प्रपंचही उत्तम पद्धतीने सांभाळीत होते. मात्र तरीही याच काळात त्यांचा मूळचा अध्यात्माविषयीचा ओढा अधिकच वाढता झाला, परिणामी घर आणि उद्योगधंद्याकडील लक्ष कमी झाले. ही परिस्थिती वरकरणी चिंता करण्याजोगी नसली अन् सर्वकाही यथायोग्य चालले होते तरीही एक प्रसंग नामदेवांच्या आयुष्याची दिशा बदलवून गेला.

नित्यनेमाने शेतावर जाणारे नामदेव एकेदिवशी त्यांच्या घराच्या उंबरठय़ावर निवांत बसले होते, तोच लहानखुऱया चणीची, गुटगुटीत अंगकाठीची, पोरवय असावे अशी एक व्यक्ती थेट नामदेवांपाशी चालत आली आणि कानडी भाषेत बोलू लागली, ‘काय रे! विसरलास का आम्हांला? नागलिंगय्यास्वामींनी सांगितले तो ‘दत्तमहाराज’ मीच आहे. आणि आता यापुढे तू आमचाच आहेस!’ असे म्हणून सोबतच्या अन्य काही व्यक्तींसह ती व्यक्ती ज्या वेगाने आली त्याच वेगाने निघूनही गेली. नामदेव बराच वेळ त्या व्यक्तीच्या बोलण्यामागील सुसंगती जुळवत बसले तोच एकाएकी कलादगीच्या अरण्यात घडलेला प्रसंग त्यांना आठवला. श्रीनागलिंगय्या शिवयोगींनी आपल्याला ज्यांच्याविषयी सांगितले होते ते आपले सद्गुरू ‘दत्तमहाराज’ हेच काही वेळापूर्वी त्या व्यक्तीच्या रूपाने तर आले नसावेत ना? त्या क्षणापासून नामदेवांनी गुरुदर्शनाचा ध्यास घेतला. अखेर बरीच पायपीट केल्यावर त्यांना दत्तमहाराजांचा शोध लागला.

पुंभारगल्लीमध्ये राहणाऱया ताराबाई शिर्पे यांच्या घरी वास्तव्य करून असलेले श्रीपृष्ण सरस्वती हेच ‘श्रीदत्तमहाराज’ आहेत याचा शोध नामदेवांना लागला. ज्यांना ‘पुंभारगल्लीचे स्वामी’ म्हणून ओळखले जाते त्या श्रीदत्तमहाराजांच्या दर्शनासाठी नामदेव पोहोचले आणि दूर अंतरावर उभे राहून श्रीमहाराजांकडे एकटक पाहू लागले. दर्शनार्थींची ये-जा आणि लगबग अव्याहत सुरू होती. इतक्यात श्रीदत्तमहाराजांनी नामदेवांकडे पाहिले आणि ‘नाम्या आला, नाम्या आला’ असे म्हणून त्यांना जवळ बोलावले. ‘यांना आपले नाव कसे ठाऊक?’ याचे आश्चर्य मनाशी घोळवत नामदेव नम्रपणे श्रीमहाराजांपाशी येऊन चरणवंदन करते झाले तोच श्रीमहाराज सद्गदित होत म्हणाले, ‘गळाला लागलास, आता पुठे जाशील?’ आणि नामदेवांचा दंड धरून उपस्थित भक्तांकडे पाहात म्हणाले, ‘पंढरीचा नामदेव म्हणतात तो हाच बरं का!’ श्रीपृष्ण सरस्वतींच्या त्या स्पर्शाने नामदेवांचे आयुष्यच बदलले. या घटनेपासून पुढे तीन दशके नामदेव त्यांच्या या सद्गुरूंसोबत, अर्थात श्रीपृष्ण सरस्वतींसोबत सावलीसारखे वावरले. नामदेवांनी श्रीगुरुचरणी केवळ तन-मन-धन नव्हे तर सर्वस्वच वाहिले.

श्रीगुरूंच्या सगुणभक्तीचे वेड काही केल्या कमी न झाल्यामुळे नामदेवांचे लक्ष परमार्थामध्येच गुंतून राहिले, परिणामी प्रपंचाकडे दुर्लक्ष झाले. अनेक लहानमोठय़ा लीलाप्रसंगातून, श्रीदत्तमहाराज आणि नामदेव यांचे गुरुशिष्याचे नाते आता घरच्या मंडळींनीही स्वीकारले होते आणि त्यामुळेच सद्गुरूंच्या अखंड सेवेत राहण्यासाठीचे सर्व अडसर दूर झाले आणि नामदेवांना दररोज नित्यनवे प्रसंग अनुभवावयास मिळाले. याच कारणाने त्यांची आध्यात्मिक प्रगती अल्पावधीतच झपाटय़ाने वाढली. परमार्थिक अधिकार प्राप्त होण्याच्या सर्व कसोटय़ांवर श्रीदत्तमहाराजांनी नामदेवांना पारखून घेतल्यामुळे प्रत्येक कसोटीतून तावून सुलाखून निघालेला हा हिरा अलौकिक तेजाने झळाळून गेला.

अश्रद्धपणा, दांभिकता, पाखंडीपणा आणि भोंदूगिरी म्हणजे काय याचे परस्पर अनुभव प्राप्त करून देत श्रीदत्तमहाराजांनी नामदेवांवरील प्रपंचमायेचे आवरणही दूर सारले. एकेदिवशी त्यांनी नामदेवांना घर लुटवून टाकण्याची आज्ञा केली. नामदेवांनी क्षणाचाही विचार न करता संपत्ती, कपडेलत्ते, घरदार सर्वकाही वाटून टाकले. लौकिक संसाराचा होम केला अन् आयुष्याचा होम करुन अखंड साथ देणाऱया पत्नी, गंगाबाईंसह ते श्रीगुरूंच्या दर्शनार्थ आले. नामदेवांना कडकडून मिठी मारत श्रीदत्तमहाराज अपार कौतुकाने म्हणाले, ‘नाम्या, तू आज सर्व जिंकलंस बरं!’ पुढे त्यांच्याच आज्ञेनुसार नामदेव, पत्नी गंगाबाईंसह अक्कलकोट, गाणगापुरादी तीर्थक्षेत्रांना भेट देण्याकरिता निघाले. तीर्थयात्रेची सांगता करून नामदेव पत्नीसह माघारी परतले तेव्हा कोल्हापुरास श्रीपृष्णसरस्वती दत्तमहाराज अवतारसमाप्ती करण्याच्या हेतूने त्यांची वाट पाहात होते. नामदेव येताच श्रीदत्तमहाराजांनी त्यांना गुरुपदेश केला अन् आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली.

येथून पुढे श्रीनामदेव महाराजांनी दत्तमहाराजांना अभिप्रेत असणारे कार्य उत्तम रितीने पार पाडले. त्यांच्या अवतारसामर्थ्याचे प्रत्यंतर अनेकांना अनेकदा आले. दोन पुत्र आणि शेकडो भक्त व शिष्यांसह श्रीनामदेव महाराजांनी त्यांचा अध्यात्ममार्ग प्रशस्त केला. 120 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या श्रीनामदेव महाराजांचे विस्तृत चरित्र परमपूज्य नाना गद्रे यांनी लिहिले आहे. श्रीनामदेव महाराजांबद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास प्रत्येक वाचकभक्ताने हे चरित्र वाचले पाहिजे आणि कोल्हापूर येथील श्रीनामदेवमठीला भेट दिली पाहिजे.
(उत्तरार्ध)
– [email protected]