प्रासंगिक – स्वामी विवेकानंदांनी दिलेला संदेश

1138

>> स्वामी सत्यदेवानंद  

स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो येथील जगप्रसिद्ध भाषणाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा आज समारोप होत आहे. त्यानिमित्त रामकृष्ण मिशनतर्फे मुंबईतील रंगशारदा नाटय़गृहात सकाळी 9 वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

1893 मध्ये शिकागो येथे स्वामी विवेकानंद यांनी द वर्ल्ड पार्लमेंट ऑफ रिलिजन्सच्या ऑगस्ट फोरममध्ये भाषणाला सुरुवात केली तेव्हा त्यांनी त्यांच्या उपस्थितांना ‘सिस्टर्स ऍण्ड ब्रदर्स ऑफ अमेरिका’ अशी उपाधी दिली. यासाठी त्यांना उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात मानवंदना मिळाली आणि दोन मिनिटांहून अधिक वेळ टाळ्यांचा कडकडाट सुरूच होता. प्रेक्षकवर्गाची उत्स्फूर्त व हृदयस्पर्शी प्रतिक्रिया जगभरातील व्यक्तींच्या मनावर छाप पाडणाऱया त्यांच्या संदेशाचे प्रतीक होती. सद्भावना, सहिष्णुता व वैश्विक स्वीकृतीचा त्यांचा संदेश व्यक्तींच्या मनामध्ये खोलवर रुजला आणि या संदेशाने जगात मत्सर, लोभ, द्वेष व रक्तपाताचे वातावरण असतानादेखील लोकांच्या जीवनात आध्यात्मिकचे ज्ञान निर्माण केले.

त्यांनी भाषणामध्ये सांप्रदायिकता, धर्मांधता व त्याचे भयानक प्रभाव तसेच धर्मांधतेमुळे पृथ्वीवर झालेले मानवी रक्तपात, लयास केलेली सभ्यता आणि संपूर्ण देशामध्ये पसरलेले निराशेचे वातावरण याबाबत सांगितले. तसेच त्यांनी प्रचंड आशावादाबाबत देखील मत व्यक्त केले. प्रसिद्ध क्लेरियन कॉल टू ह्युमॅनिटीचा उल्लेख करत ते म्हणाले, ‘माझा दृढ विश्वास आहे की, या अधिवेशनामध्ये आज झालेला टाळ्यांचा कडकडाट हा तलवार किंवा लेखणीच्या माध्यमातून सर्व धर्मांधता, सर्व छळ आणि समान ध्येये असलेल्या लोकांमधील अस्पष्ट भावनांचा शेवट होण्याचा संकेत आहे.’

स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा लोकमान्य टिळक, गांधीजी, नेहरू व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर प्रभाव पडला. ते आधुनिक हिंदुस्थानचे जनक मानले जातात. पाश्चात्य विचारवंतांनी त्यांना ‘मोल्डर ऑफ द मॉडर्न वर्ल्ड’ अशी उपाधी दिली आहे. या महान मानवतावादी व्यक्तिमत्त्वाने पूर्व तसेच पश्चिमी प्रदेशांमध्ये मानवतेचा प्रसार केला.

आज मानवता व शतकांपासून आत्मसात करण्यात आलेली मूल्ये धर्मांध विश्वास व कट्टरतेमुळे कमी झाली असतानाच स्वामीजींचा सार्वभौमत्व, सौहार्द, चारित्र्यनिर्मिती आणि मानवनिर्मित शिक्षण, सामर्थ्य व धैर्याचा संदेश अधिक महत्त्वपूर्ण आहे.

आपली प्रतिक्रिया द्या