महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत 200 हून अधिक जागा जिंकेल, संजय राऊत यांनी व्यक्त केला आत्मविश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कसबा पोटनिवडणुकी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाली. या विजयानंतर संपूर्ण महाराष्ट्रात कसबा तो झांकी हैं। महाराष्ट्र अभी बाकी है।। ही जी घोषणा ऐकायला मिळत आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, ‘मविआ म्हणून आम्ही एकत्र राहिलो तर कसब्याचा निकाल लागतो आणि थोडं इकडे-तिकडे झालं तर चिंचवडप्रमाणे निकाल लागतो. हा दोन्ही मतदारसंघातील मतदारांनी दिलेला धडा आहे. पुणेकरांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला. पुणेकर त्या आमिषाला बळी पडले नाहीत त्याबद्दल पुणेकर अभिनंदनास पात्र आहे.’

एका प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, मविआ म्हणून आम्ही एकत्र राहिलो तर कसब्याचा निकाल लागतो आणि थोडं इकडे-तिकडे झालं तर चिंचवडप्रमाणे निकाल लागतो. हा दोन्ही मतदारसंघातील मतदारांनी दिलेला धडा आहे. कसब्याचा निकाल हा या महाराष्ट्राच्या भविष्यासाठी एक मार्गदर्शक आहे. 2024 पर्यंत मविआने मजबुतीने एकत्रितपणे काम केलं तर 2024 साली विधानसभेत मविआच्या 200 हून अधिक जागा निवडून येतील तर लोकसभा निवडणुकीत आम्ही किमान 40 जागा आम्ही जिंकू हे, मी आता खात्रीने सांगतो.

हक्कभंगाच्या नोटीसबाबत प्रश्न विचारला असता राऊत यांनी म्हटले की, मी विधीमंडळाचा पूर्ण आदर करतो. माझं विधान हे विशिष्ट गटापुरतं होतं हे सगळ्यांना माहिती आहे. एका विशिष्ट आणि फुटीर गटाबाबतीतच मी हे विधान केले आहे. विधीमंडळाला, संसदेला अशा भाषेत बोलणारा मी माणूस नाही कारण मी त्या सभागृहाचा सदस्य आहे. मला कायदा, संविधान माहिती आहे. मी दौऱ्यावर असून पुण्यापर्यंत पोहोचलो आहे. मला नोटीस वाचावी लागेल, माझ्या गैरहजेरीत सरकारी कागद कोणी फाडणार नाही. गेल्यानंतर पाहीन आणि उत्तर देईन.