‘सक्षम’ युवक आणि हिंदुस्थान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>>अभय मोकाशी

देशाची आर्थिक प्रगती वेगाने आणि मोठय़ा प्रमाणात होत आहे याबद्दलचे दावे वेगवेगळ्या सरकारने आजवर केले आहेत आणि आताही केले जात आहेत. मात्र जगात सर्वात जास्त मुलांची संख्या असणाऱया आपल्या देशात पुढच्या 10 ते 15 वर्षांत नोकरी अथवा उद्योग करण्यास वयाने योग्य असणारा युवा वर्ग अशा कामांसाठी बौद्धिक आणि शारीरिकदृष्टय़ा ‘सक्षम’ असेल का, हा फार मोठा प्रश्न आहे.

कोणत्याही देशाचा आर्थिक विकास होण्यासाठी उत्तम मनुष्यबळ असण्याची गरज असते. ‘उत्तम’चा अर्थ संख्या नसून शारीरिक आणि बौद्धिक उत्तम, त्याचबरोबर चांगल्या दर्जाचे उच्च शिक्षण अथवा कौशल्य असणे महत्त्वाचे आहे. ज्या देशात बालकांकडे आणि मुलांकडे योग्य लक्ष दिले जात नाही त्या देशाचा काम करू शकणारा युवा वर्ग चांगल्या दर्जाचा नसतो. असा युवा वर्ग उभा करण्यासाठी अनेक गोष्टी करणे गरजेचे असते. यात प्रामुख्याने जन्मापासून मुलामुलींचा पौष्टिक आहार, स्त्रियांचा आहार- जन्मापासून, गरोदरपणात आणि बाळंतपणात, मुला-मुलींना तणावरहित, भयमुक्त आणि आनंदी वातावरणात उत्तम शिक्षण अशा अनेक बाबींचा समावेश आहे.

केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने हिंदुस्थानातील ‘मुले 2018’ हा अहवाल प्रकाशित केला आहे आणि त्यातील आकडेवारी धक्कादायक आहे. या अहवालाच्या प्रस्तावनेत या मंत्रालयाचे सचिव के. व्ही. इपेन यांनी मुलांच्या चांगल्या भवितव्याबद्दल फार आदर्शवादी भूमिका मांडली आहे, पण तो आदर्शवाद कागदावरच राहिला आहे. आपल्या प्रस्तावनेत इपेन म्हणतात, “मुलांच्या मानसिक, सामाजिक आणि शारीरिक विकासाचा परिणाम संपूर्ण देशाच्या विकासावर होतो.’’

अनेकदा आपण आकडेवारी आणि सांख्यिकीकडे  दुर्लक्ष करतो, पण त्यातील माहिती आपले डोळे उघडू शकते. साक्षरतेत सर्वात पुढे असणाऱया केरळमध्ये मुलींची संख्या जास्त का आहे याचा अभ्यास करण्याची गरज आहे. इतर राज्यांमध्ये, स्त्राrभ्रूणहत्या आणि मुलींना योग्य आहार आणि औषधोपचार न दिल्याने त्यांचा बालवयातच मृत्यू होतो का हे पाहणे आवश्यक आहे. नवजात बालकांना आणि वयाच्या पाच वर्षांच्या आतील मुलांमध्ये कुपोषण आढळते. त्यातून अनेक आजार उद्भवतात. कुपोषणामुळे शारीरिक विकास  व मेंदूचा विकास नीट होत नाही आणि साहजिकच अशा मुलांची बुद्धिमत्ता कमी होते.

 ‘मुले 2018’ या अहवालानुसार 2015-16 या काळात असे दिसून आले की, पाच वर्षांखालील 38 टक्के मुलांची उंची वयाच्या मानाने खुंटली होती. याचे प्रमुख कारण अयोग्य आहार आणि कुपोषण आहे. त्या अहवालानुसार, महाराष्ट्रात 34 टक्के मुलांची उंची खुंटली आहे, तर केरळ आणि गोवा या राज्यांमध्ये हे प्रमाण फक्त 20 टक्के आहे, जे देशातील सर्वात कमी आहे. अशीच परिस्थिती वजनाच्या बाबतीत आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक बालकांचे वजन सरासरीपेक्षा कमी आढळले. त्याहीपेक्षा भायानक आकडे आहेत ते बालकांमध्ये असलेला रक्तक्षय, सहा वर्षांखालील 58 टक्के मुलांना रक्तक्षय असल्याचे राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणात दिसून आले यामागचे कारण म्हणजे अयोग्य आहार किंवा कमी आहार. मुलांविरुद्ध होणाऱया गुह्यांमध्ये वाढ होताना दिसते याचे एक कारण हे असू शकते की, आता अधिकाधिक पीडित गुन्हा नोंदविण्यास पुढे येत आहेत. नॅशनल क्राइम रेकॉर्डस् ब्युरोच्या माहितीप्रमाणे 2015 साली मुलांविरुद्ध देशभरात 1 लाख 6 हजार 958 गुन्हे नोंदविण्यात आले. त्यात लैंगिक अत्याचार, विनयभंग, हिंसा, अपहरण आणि हत्या यांसारखे गुन्हे होते. त्यापुढील वर्षात 1 लाख 11 हजार 569 मुले हरवली असल्याचे नोंदविण्यात आले होते.

मुलांबद्दल इतर बातम्या असू शकतात का यासंदर्भात पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी झेव्हियर इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन्सने 99व्या वर्षात पदार्पण केलेल्या ‘सेव्ह द चिल्ड्रेन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या  कार्यशाळेचे नुकतेच आयोजन केले होते. यात मुलांसंबंधी अनेक विषय चर्चेसाठी घेण्यात आले.

मुलांच्या हितासंबंधी आपल्या देशात अनेक कायदे आणि  योजना आहेत, मात्र त्याची अंमलबजावणी नीट होत नाही. अनेक प्रगत देशांत मुलांना लक्षात ठेवून योजना आखल्या जातात. आपल्या देशात गेल्या अर्थसंकल्पात ‘मुलं’ हा शब्द फक्त दोन ते तीन वेळा उच्चारला गेला असे या कार्यशाळेत मांडण्यात आले. पुढच्या वर्षी होणाऱया सार्वत्रिक निवडणुकांत आपल्या जाहीरनाम्यात किती पक्ष मुलांसंबंधी विचार मांडतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

-हिंदुस्थानात 2011च्या जनगणनेनुसार शून्य ते 14 वर्षे या वयोगटात 16.45 लाख मुले आहेत. म्हणजेच लोकसंख्येच्या 30.76 टक्के आहे. यात मुलींची संख्या 48 टक्के आहे.

-देशातील शून्य ते 6 वर्षे या वयोगटातील अधिकांश म्हणजे 73 टक्के मुलं ग्रामीण भागात राहतात.

-मुलांचे आरोग्य हे त्यांच्या आणि देशाच्या विकासासाठी अति महत्त्वाचे आहे.

-आज महिला सर्व क्षेत्रांत पुढे असल्या तरी बालकांमध्ये दर हजार मुलांमागे मुलींची संख्या कमी आढळते. प्रगतीशील म्हणविणाऱया महाराष्ट्रातदेखील सहा वर्षांच्या आतील बालकांमध्ये दर 1000 मुलांच्या तुलनेत फक्त 894 मुली आहेत. हरयाणामध्ये हा आकडा 834 आहे, तर केरळमध्ये ही संख्या 1084 आहे.

-राष्ट्रीय पातळीवर जन्माला येणाऱया बालकांमध्ये 2014 साली दर हजार मुलांमागे 887 मुलींचा जन्म झाला आणि 2015 साली ही संख्या 881 वर आली. सहा वर्षांच्या आत मृत्यू होणाऱया बालकांमध्ये मुलींची संख्या जास्त असते.