‘एआय’मुळे वादळाचा अचूक अंदाज

आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या (एआय) मदतीने महाभयंकर वादळाचा मार्ग आणि त्याच्या तीव्रतेचा अंदाज लावणे सोपे आणि जलद होणार आहे. युरोपमध्ये नोव्हेंबर 2023 मध्ये सियारन नावाचे चक्रीवादळ आले होते. या वादळाचा अभ्यास शास्त्रज्ञ करत आहेत. दोन वर्षांपूर्वी हवामानाच्या अंदाजासाठी आधुनिक मशीन लार्ंनग तंत्रज्ञानाचा वापर होत नव्हता, मात्र आता असे अनेक मॉडेल्स तयार आहेत. ते काही मिनिटांतच 10 दिवसांचे जागतिक अंदाज तयार करू शकतात.