काय सांगता, एकटेपणा दूर होणार! डेटिंगसाठी ‘एआय’ गर्लफ्रेंड!!

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)ने आता डेटिंगच्या जगातही प्रवेश केला आहे. त्यामुळे आता लवकरच एआय-गर्लफ्रेंड मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एआय गर्लफ्रेंडचा उद्योग सध्या झपाटय़ाने वाढत आहे. एआय गर्लफ्रेंड मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी त्याच वेळी हे भविष्यात फिशिंग आणि हनी ट्रपिंगसाठी एक मोठा सापळादेखील बनण्याचा धोका निर्माण करू शकतो. सध्या मार्पेटमध्ये असे अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत ज्यात एआय जनरेटेड मुला-मुलींची डेटिंगसाठी यादी केली जाते. ज्यांच्याशी तुम्ही चॅट करू शकता, त्यांच्या तुमच्याशी बोलण्याच्या सफाईदार पद्धतीमुळे ते प्रत्यक्षात मानव नसून फक्त एक संगणक अल्गोरिदम आहे हे तुम्ही क्वचितच ओळखू शकता.

खर्च किती?

‘काही लोक व्हिडीओ गेम खेळतात तर मियामीमध्ये भेटलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, मी एआय गर्लफ्रेंडसोबत खेळतो. मी एआय-गर्लफ्रेंडवर दरमहा 10 हजार डॉलर्स खर्च करतो, असेही या तरुणाने सांगितले. पुरुषाला एआय-डेटिंग आवडते, कारण तो त्याच्या एआय मैत्रिणीला कस्टमाईज करू शकतो आणि तिच्या आवडी, नापसंतीसुद्धा बदलू शकतो, असे लेट चेकआउट होल्डिंग पंपनीचे सीईओ
ग्रेग आयझेनबर्ग यांनी सांगितले.

हनी ट्रपिंगचा धोका

एआय गर्लफ्रेंडमुळे फिशिंग आणि हनी ट्रपिंगचा धोका निर्माण होऊ शकते. गर्लफ्रेंड लॉगिन व्रेडेंशियल किंवा फायनान्शिअल डिटेल्स चोरण्याचा प्रयत्न करू शकते. हनी ट्रपिंगमध्ये अडकवण्याची भीती आहे.