चित्रकारांना रोजगार देणारं स्टार्टअप

कॉलेजच्या कट्टय़ावर मित्रांसोबत चहाचे घोट घेताना गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या विविध विषयांवरील चर्चा रंगतात. त्यामधून नवनवीन कल्पना जन्माला येतात. अशाच एका कल्पनेमधून पुण्यात कोटय़वधींचा स्टार्टअप सुरू झाला आहे. तिघा मित्रांनी सुरू केलेल्या या स्टार्टअपमुळे आज देशभरातील तब्बल 100 चित्रकारांना रोजगार मिळालाय.

पोट्रेट फ्लिप असे या स्टार्टअपचे नाव असून हाताने तयार केलेला फोटो ही त्यांची कन्सेप्ट आहे. तुमचा कोणताही फोटो कॅमेऱयातील फोटोप्रमाणे हाताने अगदी हुबेहूब तयार करून दिला जातो. सरप्राईज किंवा गिफ्ट देण्यासाठी अशा फोटोंना मागणी आहे. स्टार्टअपच्या कल्पनेबाबत कंपनीचा संस्थापक सनी कुमार म्हणाला, बीआयटी चेन्नईला शेवटच्या वर्षात शिकताना आम्ही स्टार्टअप सुरू करण्याच्या विचारात होतो. पण काही सुचत नव्हते. एकदा आमच्यातील एका मित्राला त्याच्या मैत्रिणाच्या वाढदिवसासाठी भेट म्हणून हॅण्डमेड पोट्रेट द्यायचे होते. आम्ही ऑनलाईन साईट्स सर्च केल्या. परंतु हॅण्डमेड पोट्रेट बनवून देणाऱया साईट्स खूप कमी होत्या. त्यानंतर आम्हीच या व्यवसायात उतरायचे ठरवले.

कॉलेजच्या गप्पांमधून तरुणांना सुचली अभिनव कल्पना

2018 साली सनी कुमार आणि त्यांच्या मित्रांनी ही कंपनी सुरू केली. वेबसाईट, डिजिटल मार्पेटिंग, डिलिव्हरी अशा जबाबदाऱया त्यांनी वाटून घेतल्या. मित्र, नातेवाईकांकडून पैसे घेऊन अवघ्या 25 हजारांत उभा राहिलेला हा स्टार्टअप आता कोटय़वधींच्या घरात पोहोचला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या