अरुण गवळी होणार पदवीधर

arun gawli

अरुण गवळी यावर्षी इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून पदवीधर होणार आहे. त्याने नागपूर मध्यवर्ती कारागृहात राहून पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. पाच पैकी तीन विषयात अरुण गवळी उत्तीर्ण झाला असून दोन विषयात नापास झाला  आहे. त्यामुळे या दोन विषयांची परीक्षा पास केल्यानंतर तो पदवीधर होईल, अशी माहिती इग्नुचे संचालक डॉ. पी. स्वरूप यांनी दिली आहे. अरुण गवळी याने  बीए चा अभ्यास पूर्ण करण्याकरिता इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला होता त्यामध्ये त्याने  द स्टडी ऑफ सोसायटी, सोसायटी इन इंडिया, फाउंडेशन कोर्स इन ह्युमॅनिटी अँड सोशल सायन्स, फाउंडेशन कोर्स इन हिंदी आणि मराठी यासारख्या विषयांची निवड केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या