
केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांनी आज आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. आपले राजीनामापत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले. भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेला दिलेला शब्द विधानसभा निवडणुकीनंतर पाळला नसल्याने अशा वातावरणात काम करणे योग्य नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी राजीनामा दिल्यानंतर व्यक्त केली.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा खासदार झालेल्या अरविंद सावंत यांनी आपण मंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे ट्विटरवरही लिहिले होते. त्यानंतर ते राजीनामा देण्यासाठी दिल्लीला रवाना झाले. खोटय़ा वातावरणात दिल्लीतील सरकारमध्ये तरी का राहायचे असा सवालही त्यांनी ट्विटरवर केला आहे. अरविंद सावंत यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली आणि मंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.


























































