दादर येथे आज एमपीएससी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्ग शुभारंभ सोहळा, शिवसेना आणि जाणीव ट्रस्टच्या वतीने आयोजन

शिवसेना आणि जाणीव ट्रस्टतर्फे विभागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी आयोजित एमपीएससी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ सोहळा उद्या 1 मे रोजी दुपारी 3.30 वाजता दादरच्या चित्रा सिनेमाजवळील महानगर टेलिफोन निगम कामगार संघाच्या कार्यालयात होणार आहे.

शिवसेना नेते-खासदार आणि जाणीव ट्रस्टचे अध्यक्ष अरविंद सावंत यांच्या संकल्पनेतून होणाऱया या प्रशिक्षण वर्गाच्या शुभारंभ सोहळ्याला शिवसेना नेते सुभाष देसाई यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. प्रशिक्षण वर्गाची सुरुवात 20 मेपासून होणार असून तज्ञ, अनुभवी प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत.

मर्यादित विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. अधिक माहिती आणि प्रवेश प्रक्रियेसाठी नजीकच्या शिवसेना शाखेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.