
दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांच्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील जलसफरीच्या आणि गाठीभेटीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी या आठवणींना उजाळा दिला आहे.
सचिन देसाई यांनी सांगितले की, २००८ साली ज्येष्ठ गायिका आशा भोसले रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील ज्येष्ठ संगीतकार नितीन शंकर यांच्या बंगल्यात उतरल्या होत्या. तिथे मी त्यांना भेटलो, फिरण्यासाठी सिंधुदुर्गात घेऊन गेलो. त्याठिकाणी राजन नाईक आणि विशाल देसाई यांनी फिरण्यासाठी नौका सज्ज ठेवली होती. त्या नौकेतून आशाताईंनी जलसफर केली. कोकणातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेतला,असे सचिन देसाई यांनी सांगितले. त्यावेळी कोकणात गणेशोत्सव सुरू होता आशाताईं अगदी साधेपणाने सर्वांशी संवाद साधत होत्या असेही त्यांनी सांगितले.



























































