#Ashes19 : 148 कि.मी. वेगाने डोक्याला चेंडू लागल्याने स्मिथ कोसळला, ‘ह्यूज’च्या आठवणी ताज्या

अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा खमक्या फलंदाज स्टिव स्मिथच्या डोक्यावर चेंडू आदळल्याने सर्वांचाच श्वास रोखला गेला. चेंडू लागल्यानंतर स्मिथ जमिनीवर झोपल्याने ‘फिलिप ह्यूज’च्या आठवणी ताज्या झाल्या आणि खेळाडूंसह डॉक्टरांनी मैदानावर धाव घेतली. ही दुर्घटना झाली तेव्हा स्मिथ 80 धावांवर खेळत होता. सुदैवाने त्याला जास्त दुखापत झाली नाही, परंतु त्याने मैदान सोडले आणि उपचारासाठी बाहेर गेला.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा 92.4 मैल प्रतितास (148.7 किलोमिटर वेग) वेगाचा चेंडू स्मिथच्या डोक्याला मागच्या बाजूने आदळला. यानंतर स्मिथ जमिनीवर झोपला. यानंतर आर्चर आणि खेळाडूंनी त्याकडे धाव घेतली. परंतु स्मिथ पुन्हा फलंदाजीसाठी उभा राहिल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. परंतु डॉक्टरांनी त्याला उपचारासाठी बाहेर नेले. पुन्हा मैदानात आल्यानंतर तो 92 धावांवर बाद झाला.

दरम्यान, या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी भविष्यात ‘नेक गार्ड’ घालणे अनिवार्य होईल अशी भविष्यवाणी केली.

आपली प्रतिक्रिया द्या