Ashes 2025 – जो रूटची धमाकेदार शतकीय खेळी, कासवगतीने शंभरी पार करणाऱ्या खेळाडूंच्या क्रमवारीत झाला समावेश

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या Ashes 2025 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात जो रूटला सुर गवसला आहे. पर्थ कसोटीमध्ये दोन्ही डाव मिळूनही त्याला दुहेरी आकडा गाठता आला नव्हता. मात्र, आज सुरू झालेल्या ब्रिस्बेन कसोटीमध्ये त्याने धावांची भूक भागवली आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतल 40 व शतक साजरं केलं आहे. विशेष म्हणजे जो रूटचं हे ऑस्ट्रेलियामधलं पहिलच शतक आहे. या शतकासह एका विशेष क्रमवारीत त्याच्या नावाची नोंद झाली आहे.

इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. पाच धावांवर इंग्लंडला दोन हादरे बसले होते. अशा परिस्थिती जो रूटने एकाकी खिंड लढवत इंग्लंडला 300 च्या पार नेलं आणि आपलं कसोटी कारकिर्दीमधलं 40 व शतक साजर केलं. विशेष ऑस्ट्रेलियमध्ये शतक ठोकण्यासाठी त्याला 30 डावांची वाट पाहावी लागली. यापूर्वी कसोटी खेळताना अनेक वेळा त्याने ऑस्ट्रेलियामध्ये फलंदाजी केली परंतू त्याला शतक ठोकण्यात यश आलं नाही. त्याची यापूर्वीची ऑस्ट्रेलियामधील सर्वाधिक धावसंख्ये 89 होती. मात्र, आता त्याने हा शतकांचा दुष्काळ संपुष्टात आणला आहे. सध्या जो रूट नाबाद खेळत असून त्याने 202 चेंडूंचा सामना करत 15 चौकार आणि 1 षटकार मारत 135 धावांची खेळी केली आहे. तसेच इंग्लंडने दिवसाअखेर 9 गड्यांच्या मोबदल्यात 325 धावा केल्या आहेत.

जो रूटसाठी आजचा दिवस खास ठरला आहे. कारण त्याच्या नावाची नोंद एका विशेष खेळाडूंच्या यादीमध्ये झाली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये एक शतक ठोकण्यासाठी सर्वाधिक डाव खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये जो रूटचा समावेश झाला आहे. जो रुटला ऑस्ट्रेलियामध्ये शतक ठोकण्यासाठी 30 डाव खेळावे लागले. यापूर्वी इयान हिली (41 डाव), बॉब सिम्पसन (36 डाव), गॉर्डन ग्रीनिज (32 डाव) आणि स्टिव्ह वॉ (32 डाव) या खेळाडूंना ऑस्ट्रेलियामध्ये शतक ठोकण्यासाठी सर्वाधिक वेळ लागला होता.