Ashes 2025 – अ‍ॅडलेड कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघात आक्रमक अष्टपैलू परतला, वेगवान गोलंदाज मालिकेतून बाहेर

अ‍ॅशेज मालिकेत ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडला धुळ चारल्यामुळे संघाचा उत्साह शिगेला आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंन्सचा संघात समावेश नव्हता. मात्र, तिसऱ्या कसोटीसाठी त्याची संघात निवड करण्यात आली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ आता आणखी जोमाने इंग्लंडला चारीमुंड्याचीत करण्याच्या हेतूने मैदानात उतरेल.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये अ‍ॅशेज मालिकेतील तिसरा कसोटी सामना 17 डिसेंबर रोजी अ‍ॅडलेड येथे खेळला जाणार आहे. इंग्लंडचा संघ मालिकेत पुनरागमन करण्यासाठी उतरेल, तर ऑस्ट्रेलिया सामन्यासह मालिका जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. त्यामुळे चाहत्यांना रंगतदार सामना पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पॅट कमिन्स दुखापतीमुळे पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये खेळू शकला नाही. त्याला विश्रांती देण्यात आली होती. मात्र, आता पॅट कमिन्सच्या पुनरागमनाची प्रतिक्षा संपली असून तो पुन्हा एकदा मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. याच दरम्यान, वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड अ‍ॅशेज मालिकेतून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे त्याला उर्वरित सामन्यांमध्ये खेळता येणार नाहीये.

दिनेश कार्तिकचा नवा अध्याय! IPL विजेत्या RCB नंतर आता इंग्लंडमधील संघाला देणार फलंदाजीचे धडे

अ‍ॅडलेड कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ

पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अ‍ॅलेक्स केरी, ब्रेंडन डॉगेट, कॅमेरून ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंगलिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, मायकेल नेसर, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, जेक वेदरल्ड, बो वेबस्टर