MPSC परीक्षेत सोलापूरचा आशीष बारकूल राज्यात पहिला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या अंतिम निकालात सोलापूरचा आशीष बारकूल हा सर्वसाधारण गटातून पहिला, तर मागासवर्गीय गटातून सोलापूरचा महेश जमदाडे याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. महिला गटातून पुण्यातील स्वाती दाभाडे पहिली आली आहे.

ऑगस्टमध्ये 136 पदांसाठी राज्य सेवा मुख्य परीक्षा घेण्यात आली होती.  या परीक्षेचा निकाल आज रात्री आयोगाने जाहीर केला. शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांचे गुण आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर केले आहेत.पूर्वपरीक्षेसाठी 1 लाख 96 हजार 695 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. या परीक्षेमधून राज्य सेवा मुख्य परीक्षेसाठी 2 हजार 381 उमेदवार पात्र ठरले होते. लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी 427 उमेदवार पात्र ठरले होते. त्यामधून या 136 जणांची निवड करण्यात आली

उपजिल्हाधिकारी पदासाठी वीस जणांची निवड झाली आहे. पोलीस उपायुक्त पदासाठी दोन, मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी सहा, सहाय्यक संचालक लेखा या पदासाठी एक, तहसीलदार पदासाठी सहा, उपशिक्षणाधिकारी पदासाठी 26, नायब तहसीलदार पदासाठी 4, कक्ष अधिकारी 26.  शहर राज्य शासनाच्या सेवेतील गट-अ आणि ब पदासाठी या उमेदवारांची निवड झाली आहे.