सुधीरभाऊ नाथाभाऊंच्या मार्गावर तर चालले नाहीत ना? भाजपच्या आशीष देशमुख यांचा सवाल

चंद्रपुरमधील पराभव जिव्हारी लागल्याने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करणाऱया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या भूमिकेवर पक्षातूनच प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. भाजप आमदार आशिष देशमुख यांनी मुनगंटीवारांची तुलना थेट माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याशी करत, सुधीरभाऊ नाथाभाऊंच्या मार्गावर तर चालले नाहीत ना? असा सवाल उपस्थित केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांची अशी कोणतीही इच्छा नाही की पक्षात मतभेद निर्माण व्हावेत. मुनगंटीवारांनी फडणवीसांवर श्रद्धा आणि संयम ठेवावा, असा सल्लाही आशिष देशमुख यांनी दिला आहे. मुनगंटीवार हे वरिष्ठ नेते असून त्यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदा होईल, त्यांच्यावर पक्षश्रेष्ठाRची मेहेरनजर राहील, असे आशीष देशमुख यांनी स्पष्ट केले.