
पत्रकार आशीष दीक्षित यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी निधन झाले. ते 39 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. आशीष यांनी दोपहर का सामना, न्यूज 18, टीव्ही 9, पीटीआयमध्ये काम केले होते. आशीष यांच्या पार्थिवावर डोंबिवली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.




























































