देशातील जनतेचा कौल काँग्रेसच्या विरोधात, पराभवानंतर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा धक्कादायक पराभव झाला. भाजपचे प्रताप गोविंदराव चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांचा पराभव केला. पराभवानंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी जनतेचा कौल देशात काँग्रेसच्या विरोधात हे मान्य केले.

अशोक चव्हाण म्हणाले, देशातील जनतेचा कौल काँग्रेसच्या विरोधात आहे हे मान्य आहे. या पराभवाची कारणमीमांसा राज्यनिहाय केली जाईल असेही ते म्हणाले. महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो, तसेच जनतेचा कौल मोठ्या मानाने स्वीकारायला हवा हे माझे व्यक्तिगत मत आहे असे चव्हाण म्हणाले. तसेच निवडणुकीत यश अपयश येत राहत त्यामुळे खचायची गरज नाही, पक्ष बांधणीचे काम अधिक जोमाने हाती घ्यावे लागेल असेही आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. कार्यकर्त्यांनी आता खचून विधानसभा घालवू नका, असेही ते म्हणाले. तसेच आता पक्षाचा जो आदेश येईल तो मान्य असेल असेही ते म्हणाले. नांदेड ने मला कायम मोठं केले, असे म्हणताना चव्हाण भावूक झाले.