अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर? विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवल्याची सूत्रांची माहिती

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवल्याचं वृत्त आहे. यासोबतच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेशाची चर्चाही केल्याची चर्चा आहे.

यावर अद्याप अशोक चव्हाण यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. राहुल नार्वेकर यांचा रविवारी वाढदिवस होता. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी नार्वेकरांना भेटलो, असं अशोक चव्हाणांकडून सांगण्यात आलं. मात्र, आगामी राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असं बोललं जात आहे. भाजपकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे.