Photo – अश्विनीचा मिनी ड्रेस बार्बी लूक

सध्याच्या ट्रेंडनुसार फॅशन आणि ग्लॅमर यांचे मिश्रण दाखवणाऱ्या अभिनेत्री अश्विनी चवरेच्या अलीकडील फोटोशूटने चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे.

 

अभिनयाबरोबरच अश्विनी नेहमीच तिच्या हटके फोटोशूटमुळे चर्चेत राहिलेली पाहायला मिळाली आहे.

अश्विनीने पांढऱ्या शुभ्र मिनी ड्रेसमध्ये हे खास फोटोशूट केलं आहे. या ड्रेसबरोबरच अभिनेत्रीचे कुरळे मोकळे सोडलेले केस आणि त्यात अडकवलेली पांढरी फुलं तिच्या लूकमध्ये भर घालत आहेत.

या खास लूकसाठी वापरलेल्या अश्विनीच्या हातातील नाजूक अशा मोत्याच्या ब्रेसलेटची अधिक चर्चा झाली.

या फोटोशूटमधून अश्विनीची निरागसता अधिक भावली. तसेच अश्विनीचा आत्मविश्वास, शैली आणि सौंदर्य यांची उत्तम छटा अनुभवायला मिळत आहे.

कॅमेऱ्यात कैद झालेले हे खास फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांकडून भरभरुन प्रतिक्रिया मिळत आहेत.