
Asia Cup 2025 ची टीम इंडियाने अगदी रुबाबात सुरुवात केली आहे. दुबईमध्ये खेळल्या गेलल्या UAE विरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाने 9 विकेटने दणदणीत विजयी श्री गणेशा केला आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर UAE ला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र, टीम इंडियाच्या गोलंदाजांपुढे UAE चे फलंदाज पत्त्यांसारखे कोसळले. कुलदीपने आपल्या फिरकीच्या जाळ्यात चार फलंदाजांना अचूक अडकवलं आणि शिवम दुबेने तीन विकेट घेत UAE चे पॅकअप केले. तसेच बुमराह, अक्षर पटेल आणि चक्रवर्तीने 1-1 विकेट घेत UAE चा डाव अवघ्या 57 धावांवर संपुष्टात आणला. टीम इंडियाने या 58 धावांच्या आव्हानाचा एक विकेट गमावत यशस्वी पाठलाग केला आणि 9 विकेटने सामना जिंकला. अभिषेक शर्माने 16 चेंडूंमध्ये 3 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 30 धावा चोपून काढल्या. तसेच शुभमन गिलने नाबाद 20 आणि सूर्यकुमार यादवने नाबाद 7 धावा केल्या.




























































