
आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत 15 वर्षीय खुशीच्या रूपात हिंदुस्थानने पदकाचे खाते उघडले आहे. महिलांच्या 70 किलो ’कुराश’ कुस्ती प्रकारात हिंदुस्थानच्या खुशीने कांस्यपदकाची कमाई केली. विशेष म्हणजे तिने एकही लढत न जिंकता पदकावर आपले नाव कोरले. सहा जणांच्या स्पर्धेत तिला उपांत्यपूर्व फेरीत आपोआप प्रवेश मिळाला आणि उपांत्य फेरीत तिला उझबेकिस्तानच्या खेळाडूकडून पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेत कांस्यपदकासाठी प्लेऑफ नसल्यामुळे खुशीला पोडियममध्ये स्थान मिळाले.