
आसाममध्ये गेल्या वर्षी मे महिन्यापासून पुढील वर्षभरात पोलीस कोठडीत तसेच पोलिसांनी केलेल्या कारवायांत 51 जणांचा मृत्यू झाला. गुवाहाटी उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेवर राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली.
मे 2021 ते 31 मे 2022 या कालावधीत पोलीस कारवाईमुळे किंवा पोलीस कोठडीदरम्यान 51 जणांचा मृत्यू झाला. तसेच 139 जण जखमी झाले आहेत. राज्यातील 31 जिह्यांमध्ये या घटना घडल्या आहेत.




























































