बिलाच्या शुल्लक कारणावरून बार मालकासह त्याच्या मुलास मारहाण केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील राजूरा तालुक्यातील वरूर रोड वरील सितारा बार मध्ये रात्रीच्या सुमारास घडली, हे सर्व प्रकरण cctv मध्ये कैद झाले.
बीयरच्या बॉटल व्यंकटेश मुथपुरवार याच्या डोक्यावर फोडल्याने गंभीर जखमी झाले असून त्याला चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल आहे. बारचे तोड फोड करत लाखोचे नुकसान करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलीस घटना स्थळी दाखल झाले. तीन आरोपी विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आरोपींचे नाव भीमराव गुमलवार, राजेश गुमलवार, रोहीत टोकलंवार आहेत. पुढील तपास राजूरा पोलीस करीत आहे.