लोकसभा–राज्यसभेच्या धर्तीवर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीची राज्यात चाचपणी?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभा, राज्यसभा आणि विधान परिषदेच्या धर्तीवर विधानसभा अध्यक्षांची निवड व्हावी यासाठी विधानसभा नियमात बदल करण्याची चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे. विधानसभा अध्यक्ष प्रस्तावाद्वारे निवडला जावा असा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी नाना पटोले यांनी फेब्रुवारी महिन्यात विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून अध्यक्षपद रिक्त आहे. आता अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने व्हावी यासाठी चाचपणी सुरू असल्याचे सांगण्यात येते.

विधानसभा अध्यक्षांची निवड गुप्त मतदानाने व्हावी अशी तरतूद महाराष्ट्र विधानसभा नियमात आहे. अलीकडच्या काळात 1999 मध्ये विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी निवडणूक घेण्यात आली होती. त्यानंतर अध्यक्षांची निवड बिनविरोध झाली. लोकसभा, राज्यसभा आणि विधान परिषदेत प्रस्ताव आणून निवड केली जाते. हीच पद्धत विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी राबवण्याची योजना असल्याचे सांगण्यात येते.