
श्री गणेश मूर्ती कामगार संघटनेची स्थापना तसेच नोंदणी करणार्यांसाठी 25 हजारांची लाच मागणारे सहाय्यक कामगार आयुक्त आणि त्याच कार्यालयातील वरिष्ठ लिपिक ट्रॅप झाले. आनंद भोसले आणि तानाजी साळुंखे अशी त्या अधिकार्यांची नावे असून दोघे वांद्रे येथील कामगार आयुक्त कार्यालयात कार्यरत आहेत.
एक कर्मिशयल आर्टिस्ट आणि त्याच्या इतर सहकार्यांनी गणेश मुर्तिकार कामगार संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी कामगार आयुक्त कार्यालयात अर्ज केला. सहाय्यक कामगार आयुक्त आणि उपनिबंधक आनंद भोसले यांच्याकडे हा अर्ज मंजुरीसाठी होता. अर्ज मंजुरी तसेच नोंदणीसाठी त्यांच्याकडे असलेला वरिष्ठ लिपिक तानाजी साळुंखे आणि भोसले यांनी 25 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर 20 हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र पैसे द्यायचे नसल्याने आर्टिस्टने अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकार्यांनी सापळा लावून आनंद भोसले यांना 15 हजार तर तानाजी साळुंखे यांना 5 हजार रुपये घेताना पकडण्यात आले.































































