सहाय्यक पोलीस निरीक्षक ते ‘रिंनिग मिसेस इंडिया 2019’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | पुणे

पुणे शहर विशेष शाखेत कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा विघ्नेश पाटील यांना यावर्षीचा ‘रिंनिग मिसेस इंडिया 2019’ हा मानाचा किताब मिळाला आहे. सौंदर्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर स्वत:ला सिद्ध करण्याच्या या स्पर्धेत प्रेमा पाटील या सर्वात अव्वल ठरल्या. 4 जुलै 2019 रोजी बाणेर येथील ऑर्किड हॉटेलमध्ये या स्पर्धेची अंतिम फेरी दिमाखात पार पडली.

प्रेमा पाटील या मुळच्या कराडच्या. त्यांचे एम.कॉम पर्यंतचे शिक्षण झालेले आहे. सध्या त्या पुणे शहरातील विशेष शाखेत पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या व्यतिरीक्त त्या कार्बोनरी या सामाजिक संस्थेशी सलग्न असून संस्थेकडून केल्या जाणाऱ्या सामाजिक कामांमध्ये त्या सहभागी असतात. त्याचबरोबर प्रेमा पाटील या पुणे शहर व पुण्याच्या जवळपास असलेल्या गावातील गरजू गरीब मुलांना शिकविण्याचेही काम त्या करतात.

‘जी 20 समिट’ वरचे सादरीकरण, नृत्य आणि हजरजबाबी या गुणांमुळे त्या स्पर्धेत अव्वल ठरल्या. ‘परेड मार्च ते रॅम्प वॉक’ असा प्रेमा पाटील यांचा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरला आहे.