Photo – 18 व्या वर्षी काम्या कार्तिकेयनने दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करून रचला इतिहास

मुंबईच्या नेव्ही चिल्ड्रन स्कूलची माजी विद्यार्थिनी काम्याने इतिहास घडवला आहे. अवघ्या 18 व्या वर्षी तिने दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करून देशाचे नाव अनोख्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.

हिंदुस्थानी नौदलातील अधिकाऱ्यांची 18 वर्षीय मुलगी काम्या कार्तिकेयन हिने इतिहास रचला आहे. लहान वयात दक्षिण धुवापर्यंत स्किइंग करत पोहोचल्याचा तिने आगळा वेगळा विक्रम नोंदवला आहे.

दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करून हिंदुस्थानची पहिली आणि जगातली दुसरी सगळ्यात लहान महिला बनली आहे. तिच्या या विक्रमाबद्दल हिंदुस्थानच्या नौदलाने तिचे अभिनंदन केले आहे.