Video – पक्ष फोडून मिळालेल्या सत्तेला चिमट्यानेही स्पर्श करणार नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर अचानक 2 जुलै रोजी महाराष्ट्र राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर त्यांच्यासोबतच्या आठ आमदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. वर्षभरापूर्वी मिंधे गट आणि आता अजित पवार अशी अभूतपूर्व राजकीय गोंधळाची स्थिती महाराष्ट्रात उद्भवली. दरम्यान, माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून त्यात पक्षफुटीतून मिळालेली सत्ता अजिबात नको, असं ते म्हणताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर वाजपेयी यांच्या संसदेतील भाषणाच्या एका व्हिडीओने चांगलंच लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओत वाजपेयी हे ‘पक्ष फोडून, सत्तेसाठी नवीन युती करून जर सत्ता हातात आली तर अशा सत्तेला मी चिमट्यानेही स्पर्श करणार नाही, असं म्हणताना दिसत आहेत. त्यामुळे फोडाफोडी करून सत्ता मिळवणाऱ्या भाजपला हा घरचा आहेर म्हणावा असं हे विधान असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Molitics (@moliticsindia)