अथर्व राणे ‘देवगड कोस्टल मॅरेथॉन’चा ब्रॅण्ड ऍम्बेसेडर

511

सिंधुदुर्गचा सुपुत्र आणि मराठमोळा धावपटू अथर्व राणे याची 15 नोव्हेंबरला देवगड येथे आयोजित देवगड कोस्टल मॅरॅथॉनचा ब्रॅण्ड ऍम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. अथर्वने टाटा आंतरराष्ट्रीय मुंबई मॅरेथॉन पूर्ण केली होती. शिवाय जगातील सर्वात उंचावरील कठीण मॅरेथॉन दौड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लडाख मॅरेथॉनमध्ये देशी धावपटूंच्या गटात पदक पटकावून महाराष्ट्राचा झेंडा लडाखमध्ये फडकावला होता.

लोकसंवाद आणि देवगड जामसंडे स्पोर्ट्स क्लबने या सागरी मॅरेथॉन दौडीचे आयोजन 15 नोव्हेंबरला देवगड किनारी केले आहे. 21 किमी आणि 10 किमी अशा गटात पार पडणाऱ्या या मॅरेथॉन दौडीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या राज्यातील धावपटूंनी सहभाग नोंदणीसाठी 8291373299 या क्रमांकावर संपर्क साधावा अथवा www.alpharacingsolution.com या संकेतस्थळावर आपले नाव नोंदवावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या