एटीएम कार्ड बदलून 71 हजारांची फसवणूक

एटीएममधून पैसे निघत नसल्याचे निमित्त साधून एका व्यक्तिने 71 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना लातूर येथे घडली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या फसवणूक प्रकरणी महावितरणमध्ये लाईनमन म्हणून काम करीत असलेल्या रामजी महाजन तोंडेवाड यांनी तक्रार दाखल केली आहे. एसबीआय बँकेत त्यांची पगार जमा होतात. रेणापूर फाट्यावरील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरमध्ये ते 18 डिसेंबर 2019 रोजी ते पैसे काढण्यासाठी गेले होते. परंतु एटीएम मधून पैसे निघत नव्हते. त्या ठिकाणी थांबलेल्या एका व्यक्तीने त्यांना पैसे काढण्यासाठी मदत केली व त्यांचे एटीएम कार्ड ठेवून घेऊन त्याच्या जवळचे कार्ड दिले.

त्यांच्या मोबाईलवर एटीएममधून पैसे काढण्यात आल्याचे मेसेज अनेकदा आले. परंतु त्यांना इंग्रजी येत नसल्यामुळे त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. परत जेव्हा एटीएम मधून पैसे काढण्यासाठी ते गेले तेव्हा पैसे निघाले नाहीत. त्यांच्याजवळचे एटीएम हे त्यांचे नसून ते इतरांचे असल्याचे निदर्शनास आले. त्या एटीएमवर प्रल्हाद मारोती मोरे असे नाव होते. त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता त्यांच्या बँक खात्यामधून एटीएमच्या माध्यमातून तब्बल 71,600 रुपये काढून घेण्यात आल्याचे निदर्शनास आले. फसवणूक केली म्हणून अज्ञात व्यक्ती विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या