ठाण्यात चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

616

एटीएम सेंटरच्या सुरक्षा रक्षकाने चार वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना यशोधन नगरात घडली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दशरथ कांबळे या सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे.

यशोधन नगर परिसरात पीडित मुलगी आईसोबत राहते. मुलीची आई कामाला जात असल्याने ती मुलीला परिसरातील पाळणाघरात सोडत असे. या पाळणाघराच्या इमारतीजवळ एटीएम सेंटर असून या येथे दशरथ हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. त्यामुळे अनेकदा तो या पाळणाघरात येत असे. आज तो पाळणाघरात आला. त्याने मुलीला अभ्यास शिकवतो असे सांगून तिच्यावर अत्याचार केला. आई घरी आल्यानंतर मुलीने हा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दशरथला अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या