नालासोपारा स्फोटकांप्रकरणी घाटकोपरमधून पाचवी अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 सामना ऑनलाईन । मुंबई

वसईतील नालासोपारा येथे एटीएसने जप्त केलेल्या स्फोटकांप्रकरणी  आणखी एका आरोपीला घाटकोपरमधून अटक केली आहे. अविनाश पवार (30) असं अटक केलेलेल्या आरोपीचं नाव असून त्याला न्यायालयात हजर केले असता 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नालासोपारा येथे दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या कारवाईत सनातन संस्थेशी संबंधीत असलेल्या वैभव राऊतच्या घरातून गावठी बॉम्बसह स्फोटकं जप्त करण्यात आली होती. वैभव राऊतच्या अटकेनंतर एटीएसने पुणे, औरंगाबाद आणि जालना येथे कारवाई करत शरद कळस्कर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर यांना या अगोदरच अटक केली आहे. शुक्रवारी रात्री एटीएसने अविनाश पवारला घाटकोपरमधून अटक केली असून, या प्रकरणी आरोपींची संख्या पाचवर पोहोचली आहे.