गोदावरी नदीकाठी तलवारीने जखमी करून 1 लाखाची लूट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । नांदेड

गोदावरी नदीच्या काठावर स्मशानभूमीच्या शेजारी दोन जणांनी तलवारीने गंभीर जखमी करून एका व्यक्तीकडून 1 लाख 2 हजार रुपयांचा ऐवज लुटला. या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनितसिंघ सजीतसिंघ भाटीया (19) असे फिर्यादी विद्यार्थ्यांचे नाव आहे.

विद्यार्थ्यांने दिलेल्या तक्रारीनुसार 26 सप्टेंबरच्या रात्री 10.30 च्या सुमारास गोवर्धनघाट स्मशानभूमीच्या बाजूला गोदावरी नदीच्या काठी तो आणि त्याचे काही मित्र गप्पा मारत असतांना दोन अनोळखी माणसे आली. त्यापैकी एक सरदार होता आणि एक दुसरा त्या दोघांनी भाटीयाचा मित्र ऋषीकेश सुनिल वैद्य यास तलवारीने पोटात गंभीर जखमी करून त्याची साडे तीन तोळे सोन्याची चैन 1 लाख रुपये किंमतीची तसेच भाटीयाला आपल्या कडील बंदूक पोटाला लावून त्याच्या गळ्यातील चांदीची चैन 2 हजार रुपयांची बळजबरीने चोरून नेली आहे. वजिराबाद पोलीसांनी भारतीय दंडविधानाच्या कलम 394, 34 आणि भारतीय हत्यार कायद्याची कलमे या नुसार गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरिक्षक किरण पठारे हे करीत आहेत.