शिवसेना आमदारावर जीवघेणा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. सुदैवाने या हल्ल्यातून ते बचावले आहेत. शुक्रवारी 5 ते 6 जणांनी त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला.  या प्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात ५ अज्ञातांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुकाराम काते यांनी दिवसरात्र मेट्रोचं काम सुरू असल्याबद्दल आंदोलन केलं होतं. या आंदोलनामुळे चिडलेल्या कंत्राटदाराने भाडोत्री गुंड पाठवून हा हल्ला केला असावा असा आरोप करण्यात येत आहे. काते यांच्यासोबत असलेल्या सुरक्षारक्षकामुळे त्यांचा जीव बचावला आहे. मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर भागामध्ये हा हल्ला झाला आहे.