जगभर हिंदूंवरील हल्ले एक हजार टक्क्यांनी वाढले

जगभरात हिंदूंवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये तब्बल एक हजार टक्क्यांची वाढ झाली आहे. अमेरिकेमध्ये सर्वाधिक मूळ हिंदुस्थानी वंशांच्या नागरिकांना टार्गेट केले जात आहे, तर ब्रिटनमध्ये पाकिस्तानी जिहादींच्या टोळींकडून हिंदू मंदिरांवर हल्ले करण्यात येत आहेत. ‘नेटवर्क कॉन्टॅजिअन रिसर्च इन्स्टिटय़ूट’ या अमेरिकन संस्थेच्या सर्वेक्षणातून ही माहिती उजेडात आली आहे. जगभरात हिंदूंवर हल्ले व द्वेषाचे वातावरण निर्माण करण्यात कट्टर इस्लामिक संघटना आघाडीवर असल्याचा दावा संस्थेने केला आहे.