
लातूर शहरातील जुना रेणापूर नाका भागात गुप्तीचा धाक दाखवून मी लातूरचा डॉन आहे असे म्हणत केळीच्या गाड्यावरील केळी फेकून देत दहशत माजवण्याचा प्रयत्न करीत असताना एकाला पोलिसांनी अटक केली.
या प्रकरणी भिमराव श्रीपती बेल्लाळे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, मोटरसायकलवर पेट्रोलिंग करीत असताना जुना रेणापूर नाका येथे एक व्यक्ती शस्त्राचा धाक दाखवून दहशत माजवण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळाली. त्याठिकाणी राजकुमार शेरसिंग जुन्नी (रा. इंडियानगर) हा गुप्ती हातात घेऊन केळीच्या गाड्यावरील केळी फेकून देत होता व गाडेवाल्याला मी लातूरचा डॉन आहे, तु मला ओळखत नाहीस का असे म्हणून धमकी देत होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीकडील गुप्ती जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



























































