संभाजीनगर – करोडी शिवारात परप्रांतीय मजुराचा निर्घृण खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संभाजीनगर जिल्ह्यातील करोडी शिवारात राहणाऱ्या एका परप्रांतीय बांधकाम मजुराचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना शनिवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. धारदार शस्त्राने मानेवर व डोक्यात वार करून हा खून करण्यात आला आहे. कैलास निगवल (27) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे.

वाळूज औद्योगिक क्षेत्राला लागत व धुळे सोलापूर महामार्गावर असलेल्या कोरडी शिवारात ही घटना घडली. कोराडी येथील अशोक जाधव यांचे गट नंबर 111 मध्ये गोडाऊन बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी 12 मजूर कामवर आहे. गेल्या चार महिन्यापासून कैलास निगवल (रा.मध्यप्रदेश) हा पत्नी व तीन मुलांसह राहत होता. या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामावर तो मजूर म्हणून काम करत होता.

शनिवारी सकाळी खून झाल्याचे उघडकीस आले. घरातील 70 हजार रुपयांची रोकड लंपास असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. हा खून नेमका कसा झाला याचे कारण समजू शकले नाही. खून झाल्याची माहिती मिळताच दौलताबाद पोलीस ठाण्याचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. तर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश अघाव यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत दौलताबाद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पत्नी समोर केली पतीची हत्या

हा मजूर गेल्या अनेक महिन्यापासून येथेच कामावर आहे. या परिसरात जवळपास अनेकांना शेड बांधून देण्यात आले आहे. ते आपल्या कुटुंबासह येथे राहतात. मयत कैलास त्याला लिहिता वाचता येत नसल्यामुळे त्याचे कुठल्याही बँकेत खाते नाही. त्यामुळे आतापर्यंतच्या मजुरीचे सर्व रक्कम घरामध्ये ठेवली होती. ही रक्कम मारेकर्‍यांनी लंपास केली. शस्त्राने कैलासवर वार केला. यावेळेस पत्नीला जाग आली असता. तिने आरडाओरड केली मात्र तोपर्यंत मारेकरी पसार झाला होता, या घटनेने पत्नी भयभीत झाली आहे.