चुरस, थरार, उत्कंठा… अन् हुश्श! सिडनी कसोटी रोमहर्षकरीत्या अनिर्णीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिस्बेन, अॅडलेड अन् मेलबर्न या तिन्ही कसोटींत बाजी मारत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धची अॅशेस क्रिकेट मालिका आधीच खिशात टाकलेली होती. मात्र ऑस्ट्रेलियाच्या विजयी हॅट्ट्रिकपेक्षा उभय संघांमध्ये अनिर्णीत सुटलेला सिडनीतील चौथा कसोटी सामना क्रिकेटप्रेमींसाठी खऱ्या अर्थाने पर्वणी ठरला. रविवारी अखेरच्या दिवशी मैदानावरील नाटय़मय घडामोडीनंतर रंगलेली चुरस… एकएका बळीनंतर वाढत गेलेला थरार.. अखेरच्या टप्प्यात ताणलेली उत्पंठा… धावांपेक्षा चेंडू मोजण्यात गुंतलेले क्रिकेटप्रेमी… अन् अखेरच्या चेंडूपर्यंत श्वास रोखायला लावणारी कसोटी अखेर अनिर्णीत अवस्थेत सुटल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी व पाठीराख्यांनी हुश्श करत सुटकेचा निःश्वास सोडला. दोन्ही डावांत शतक झळकाविणारा उस्मान ख्वाजा या कसोटीचा मानकरी ठरला.

स्टोक्स, बेअरस्टॉची झुंज

आघाडीचे फलंदाज माघारी परतल्यानंतर बेन स्टोक्स व जॉनी बेअरस्टॉ या मधल्या फळीतील जोडीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा प्रतिकार करत कसोटी वाचविण्यासाठी निकराची झुंज दिली. स्टोक्सने 123 चेंडूंत 60 धावा करताना 10 चौकारांसह एक टोलेजंग षटकारही ठोकला. मात्र नाथन लायनच्या फिरकीच्या जाळ्यात तो अडकला अन् स्टिव्हन स्मिथकडे झेल देऊन बसला. बेअरस्टॉने 103 चेंडूंत 3 चौकारांसह 41 धावांची
खेळी केली.

कमिन्सने सामना फिरवला

बेन स्टोक्स बाद झाला तरी इंग्लंड कसोटी वाचविणार असेच चित्र होते. मात्र कर्णधार पॅट कमिन्सने 85व्या षटकांत जोस बटलर (11) आणि मार्प वुड (0) यांना बाद करून सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकविला. 38 चेंडूंना सामोरे गेलेल्या बटलरला कमिन्सने पायचित पकडले, तर त्याच्या जागेवर आलेला मार्प वुडही खाते न उघडताच पायचित होऊन माघारी परतला. त्यानंतर बॉलंडने जॉनी बेअरस्टोला लाबूशेनकरवी झेलबाद करून इंग्लंडच्या फलंदाजीतील हवा काढून घेतली.

धावफलक

ऑस्ट्रेलिया पहिला डाव ः 8 बाद 416 धावा (घोषित)

इंग्लंड पहिला डाव ः 294 धावा.

ऑस्ट्रेलिया दुसरा डाव ः 6 बाद 265 धावा (घोषित)

इंग्लंड दुसरा डाव ः झॅक क्रावली पायचित गो. ग्रीन 77, हसीब हमीद झे. पॅरी गो. बॉलंड 9, डेव्हिड मलान त्रि. गो. लायन 4, जो रुट झे. पॅरी गो. बॉलंड गो. 24, बेन स्टोक्स झे. स्मिथ गो. लायन 60, जॉनी बेअरस्टो झे. लाबूशेन गो बॉलंड 41, जोस बटलर पायचित गो. कमिन्स 11, मार्प वुड पायचित गो. कमिन्स 0, जॅक लीच झे. वार्नर गो. स्मिथ 26, स्टुअर्ट ब्रॉड नाबाद 8, जेम्स अॅण्डरसन नाबाद 0.

अवांतर ः 10, एपूण ः 102 षटकांत 9 बाद 270 धावा.

बाद क्रम ः 1-46, 2-74, 3-96, 4-156, 5-193, 6-218, 7-218, 8-237, 9-270.

गोलंदाजी ः मिचेल स्टार्प 18-2-68-0, पॅट कमिन्स 22-5-80-2, स्का@ट बॉलंड 24-11-30-3, नाथन लायन 22-10-28-2, पॅमेरुन ग्रीन 10-1-38-1,
स्टिव्हन स्मिथ 4-1-10-1.