ऑस्ट्रेलियन ओपन, रशियाच्या असलानची झेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक क्रमवारीत 114वी रँकिंग असलेल्या रशियाच्या असलान कारात्सेव याने मंगळवारी उत्तुंग झेप घेतली. त्याने ऑस्ट्रेलियन टेनिस या प्रतिष्ठेच्या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत ग्रिगोर दिमीत्रोवला 2-6, 6-4, 6-1, 6-2 अशा चार सेटमध्ये पराभूत करीत पुरुषांच्या एकेरीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. ग्रॅण्डस्लॅमच्या पहिल्याच प्रयत्नात उपांत्य फेरीत धडक मारणारा तो व्यावसायिक युगातील पहिलाच टेनिसपटू ठरलाय हे विशेष.

सेरेनाने केली फेडररची बरोबरी

अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिनेही मंगळवारी ऐतिहासिक कामगिरी केली. तिने ग्रॅण्डस्लॅममधील एकेरीत 362व्या विजयाला गवसणी घातली. टेनिस ग्रॅण्डस्लॅममध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱया टेनिसपटूंच्या यादीत आता सेरेना विल्यम्स रॉजर फेडररच्यासाथीने पहिल्या स्थानावर विराजमान आहे. दोघांनी 362 विजय मिळवले आहेत. सेरेना विल्यम्स हिने सिमोना हालेपला 6-3, 6-3 असे पराभूत केले.

जोकोविच अंतिम चारमध्ये

सर्बीयाचा स्टार खेळाडू नोवाक जोकोविच यानेही अंतिम चारमध्ये प्रवेश केला. त्याने अॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे कडवे आव्हान 6-7, 6-2, 6-4, 7-6 अशा फरकाने परतवून लावत पुढे पाऊल टाकले.