
रोमहर्षक उपांत्य लढतीत पाकिस्तानची विजयी दौड रोखून अंतिम फेरी गाठणारा अनुभवी ऑस्ट्रेलियन संघ उद्या झुंजार न्यूझीलंडशी टी-20 विश्वचषक अंतिम लढतीत झुंजणार आहे. उभय संघाचे फलंदाज आणि गोलंदाज या स्पर्धेत तुफान फॉर्मात असल्याने उद्याच्या लढतीत दुबईच्या मैदानावर षटकार, चौकारांची आतिषबाजी क्रिकेट शौकिनांना पाहायला मिळणार हे मात्र निश्चित.
बलाढय़ कांगारूंचा संघ स्पर्धेतील आरंभाच्या अपयशानंतर पुन्हा विजयी लयीत परतला आहे. न्यूझीलंडनेही पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर विजयाचा धडाका लावत फायनल गाठली आहे. एरव्ही हुलकावणी देणारे टी-20 विश्वचषकाचे जेतेपद यंदा पटकवायचेच या जबर निर्धाराने विलियम्सन आणि पंपनी मैदानात उतरणार आहे. त्यामुळे उद्याची अंतिम लढत जगभरातील क्रिकेट शौकिनांसाठी हाय व्होल्टेज ठरणार यात शंका नाहीय. उपांत्य लढतीत इंग्लंडचा विजयरथ रोखणाऱया न्यूझीलंडपुढचे उद्याचे आव्हान अधिक बलवान आहे. शिवाय अनुभवी क्रिकेटपटूंचा भरणा असलेला ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ सध्या तरी अतिशय धोकादायक संघ वाटत आहे.




























































