सामना ऑनलाईन
2331 लेख
0 प्रतिक्रिया
शांती कायदा नव्हे तर ट्रम्प कायदा, काँग्रेस नेते जयराम रमेश यांची टीका
काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केंद्र सरकारच्या SHANTI विधेयकावर गंभीर प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट आरोप केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प...
रत्नागिरी शहरात बिबट्या; थिबा पॅलेस, विश्वनगर, आंबेशेत परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
रत्नागिरी शहरात बिबट्याने शिरकाव केल्याने रत्नागिरीकरांची झोप उडाली आहे.दोन दिवसांपूर्वीच अभ्युदयनगर येथे सीसीटिव्हीत बिबट्या दिसला होता.यापार्श्वभूमीवर पोलिसांनी थिबा पॅलेस, विश्वनगर, आंबेशेत परिसरातील सर्व नागरिकांना...
माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन, 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री तसेच माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने राष्ट्रीय राजकारणातील एक...
आता हिवाळाच्या सुट्टीतही न्यायालयीन कामकाज सुरू राहणार, सरन्यायाधीश सुर्य कांत याचा निर्णय
न्यायपालिकेत साधारणतः सुट्ट्यांचा काळ शांततेचा मानला जातो. मात्र यंदा हिवाळी सुट्टीतही न्यायालयीन कामकाज सुरू राहणार आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी मोठा निर्णय घेत हिवाळी...
मनरेगा योजनेवर मोदी सरकारने बुलडोजर चालवला, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची टीका
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी VB-G-RAM-G विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 20 वर्षांपूर्वी डॉ. मनमोहन सिंह पंतप्रधान असताना...
आम्हाला फक्त खुर्च्यांची चिंता असती, तर आम्ही भाजपसोबत गेलो असतो; आदित्य ठाकरे यांचा घणाघात
ज्या ज्या शहरांवर किंवा राज्यांवर भाजप सत्तेत आली, तिथे उलट दिशेने प्रवास सुरू झाला आहे टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार...
वाशिममध्ये भाजप उमेदवाराकडून शिवसेना उमेदवारावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न, जीवे मारण्याची दिली धमकी
वाशिममध्ये भाजपच्या उमेदवाराकडून दादागिरीचा गंभीर प्रकार समोर आला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या उमेदवारावर चाकूहल्ल्याचा प्रयत्न आणि गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली...
अंमलबजावणीबाबत मात्र दुष्काळ, शेतकरी योजनांबाबत रोहित पवार यांची टीका
शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची खैरात करणाऱ्या सरकारला या योजनांसाठी निधीची तरतूदही करता आली नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी...
लोकसभेत ‘जी राम जी’ विधेयकावर रणकंदन, विरोधकांकडून कागद फाडून निषेध
लोकसभेत आज महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याऐवजी (MGNREGA) येणारे जी राम जी बिल मंजूर करण्यात आले. या विधेयकावरून सभागृहात मोठा गदारोळ झाला....
2029 मध्ये मित्रपक्षांना संपवून भाजप स्वबळावर निवडणूक लढणार, रोहित पवार यांचे भाकीत
साखरेच्या सुरीने मित्रपक्षाचा गळा कापण्यात भाजपचा हात कुणीही धरणार नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली. तसेच 2029...
त्याच केंद्रीय गृहमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना वेळ देणे मनाला वेदना देणारे, सुप्रिया सुळे यांची टीका
नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना केंद्र व राज्यातील सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दांत टीका केली. सत्तेत असलेल्यांना...
ड्रग्समधून मिळालेला पैसा निवडणुकांमध्ये वापरला जातो का? सुषमा अंधारे यांचा गंभीर सवाल
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाचगणीतील कथित ड्रग्स प्रकरणावरून सरकार, प्रशासन आणि विशेषतः साताऱ्याचे पालकमंत्री...
श्रीवर्धनमध्ये हिट अँड रन; पुण्याच्या पर्यटकाच्या थार गाडीने मोटारसायकलस्वार ठार
श्रीवर्धन तालुक्यात हिट अँड रनची गंभीर घटना घडली आहे. पुण्याहून आलेल्या पर्यटकाच्या थार गाडीने एका मोटारसायकलस्वाराला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात...
यापुढे परप्रांतीयांना एक इंचही जमीन विकणार नाही, तळावासीयांचा एकमुखी निर्धार
रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू आहेत. दलालांना हाताशी धरून कवडीमोलाने या जमिनी धनदांडग्यांच्या घशात घातल्या जात आहेत. त्यामुळे आपल्याच गावात आपण...
हा सागरी किनारा… सुक्या म्हावऱ्याचा नजारा; मुंबई, ठाणे, पुणेकरांच्या आवडत्या बोंबील, सोड्याची फुल्ल टू...
मुरुड म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो अथांग सागरी किनारा आणि इतिहासाची साक्ष देणारा किल्ला. येथील निसर्गाचे मनोहारी रूप डोळ्यांत साठवण्यासाठी आणि उसळत्या चंदेरी...
रायगडच्या बीचवर 42 वॉर्डनचा वॉच, थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पोलीस इन अॅक्शन, मद्यपींना आवरणार; चोऱ्यामाऱ्या...
थर्टी फर्स्टचे काऊंडटाऊन आता सुरू झाले असून अनेकांना वेध लागले आहेत ते रायगडातील समुद्रकिनाऱ्यांचे. निसर्गाच्या सान्निध्यात नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाईसह बच्चेकंपनीही उत्सुक आहे. थर्टी...
आंबिवलीच्या इराणी चोरट्याचा चार मिनिटांत ‘खेळ खल्लास, कर्नाटकातून मुसक्या आवळल्या
नागरिकांच्या सोनसाखळ्या हिसकावून फरार झालेल्या आंबिवलीच्या इराणी चोरट्याचा भिवंडी पोलिसांनी चार मिनिटांत खेळ खल्लास केला. हा चोरटा कर्नाटकातील बिदर येथे लपून बसल्याची माहिती मिळताच...
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे निधन, हिंदुस्थानी कला विश्वावर शोककळा
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे निधन झाले आहे. भारतीय शिल्पकलेला आधुनिक ओळख देणाऱ्या राम सुतार यांनी देशातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींची स्मारके व पुतळे साकारले....
पुण्यात आंतराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, उच्चशिक्षित तरुणांचे पेडरलरशी कनेक्शन
पिंपरीतील एका सदनिकेत हायड्रोपोनिक गांजाची लागवड करून चालविण्यात येणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकत पुणे पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला. पोलिसांनी एकसलग पुणे, पिंपरी, मुंबई...
मेस्सीने दिली वनताराला भेट
जागतिक फुटबॉल आयकॉन लिओनेल मेस्सी यांनी अनंत अंबानी यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या वन्यजीव बचाव, पुनर्वसन आणि संवर्धन केंद्र वनतारा येथे विशेष भेट दिली. या केंद्रात...
अकोला जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अकोला जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात...
नितीश कुमारांनी हिजाब खेचला! ‘त्या’ महिला डॉक्टरने बिहार सोडला, सरकारी नोकरीत रुजू होण्यास नकार
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भरकार्यक्रमात चेहऱयावरील हिजाब खेचल्यामुळे मानसिक धक्का बसलेल्या डॉ. नुसरत परवीन यांनी बिहार सोडले आहे. त्या पश्चिम बंगालला आपल्या कुटुंबीयांकडे...
अणुऊर्जा क्षेत्रात खासगी कंपन्यांना प्रवेशाची घाई कशासाठी? शिवसेनेचा केंद्र सरकारला सवाल
‘अणुऊर्जेच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे, मग या क्षेत्रात खासगी कंपन्यांना प्रवेश देण्यासाठी एवढी घिसाडघाई कशासाठी, असा सवाल करतानाच, स्वतंत्र देखरेखीशिवाय अणुऊर्जा...
दुबारांना वगळणार नाही, मात्र मतदान एकदाच करू देणार! आतापर्यंत 80 हजारांवर दुबार नावे आढळली
मुंबईत आढळलेल्या 11 लाखांकर दुबार मतदार नावांची छाननी पालिकेच्या माध्यमातून सुरू असून आतापर्यंत 80 हजारांकर नावे दोन ठिकाणी असल्याचे समोर आले आहे. मात्र या...
अणुऊर्जा विधेयक जेपीसीकडे, जबाबदारी कमी करून खासगीकरण धोकादायक; अरविंद सावंत यांनी दिला इशारा
अणुऊर्जा क्षेत्राशी संबंधित ‘The Sustainable Harnessing and Advancement of Nuclear Energy and Transformation India Bill’ वर लोकसभेत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार...
ढाक्यातील हिंदुस्थानी उच्चायुक्तांना धमक्या; दिल्लीत बांग्लादेशच्या उच्चायुक्तांना बोलावून घेतले
ढाक्यातील हिंदुस्थानच्या दूतावासाच्या सुरक्षेबाबत वाढत चाललेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान सरकारने बुधवारी दिल्लीत बांग्लादेशच्या उच्चायुक्तांना बोलावून घेतले. बांग्लादेशची राजधानी ढाका येथे हिंदुस्थानी मिशनच्या बाहेर गेल्या...
माफी मागणार नाही, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरवरील विधानावर ठाम
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वरील वक्तव्याबद्दल माफी मागण्यास ठाम नकार दिला आहे. “मी काहीही चुकीचे बोललेले नाही. त्यामुळे...
बांग्लादेशमधून हिंदुस्थानमध्ये सर्वाधिक घुसखोरी; 18 हजार 851 घुसखोरांना अटक
वर्ष 2014 पासून आतापर्यंत हिंदुस्थान–चीन सीमेवर घुसखोरीचा एकही प्रकार नोंदवण्यात आलेला नाही, अशी माहिती केंद्र सरकारने मंगळवारी संसदेत दिली. मात्र याच कालावधीत पाकिस्तान, बांग्लादेश,...
ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा ऑनलाइन कामावर बहिष्कार
बिघडलेले प्रिंटर, कालबाह्य झालेल्या लॅपटॉपवर काम करताना अधिकाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र याबाबत अनेकदा लेखी तक्रार करूनही कानाडोळा केला जात आहे. त्यामुळे...
खोपोलीत कारचा अपघात; चार जखमी
खोकल्याची उबळ आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव कार उलटल्याची घटना आज खोपोली-शिळफाटानजीक घडली. या अपघातात चार प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दाखल केले...






















































































