
कॅलिफोर्निया येथील लॉन्ग बीच येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान अमेरिकेतील मॅक्स पार्क या 21 वर्षीय ऑटिझमग्रस्त तरुणाने इतिहास रचला आहे. मॅक्सने 3x3x3 रुबिक क्यूब अवघ्या 3.13 सेकंदांत सोडवला आहे. मॅक्सचा हा व्हिडीओ ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ने आपल्या ट्विटरवरून शेअर केला असून तो व्हायरल होत आहे.
ऑटिझम आजाराने ग्रस्त असूनसुद्धा मॅक्सने केलेल्या आतापर्यंतचे वर्ल्ड रेकॉर्ड कौतुकास्पद आहे. मॅक्सवर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. याआधी सर्वात कमी वेळात रुबिक क्यूब सोडविण्याचा विश्वविक्रम चीनच्या युशेंग डू नावाच्या व्यक्तीकडे होता. 2018 मध्ये त्याने 3.47 सेकंदामध्ये रुबिक क्यूब सोडवला होता.























































