1 एप्रिलपासून बिलांच्या ऑटो पेमेंटमध्ये येऊ शकतात अडचणी, हे आहे कारण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
radiation-mobile

बँकिंग ट्रांझॅक्शनच्या क्षेत्रात गुरुवारी 1 एप्रिलपासून काही बदल होणार आहेत. उद्यापासून सर्व ओटीटी सब्सक्रिप्शन चार्ज, बिलांचे ऑटो पेमेंट किंवा ऑटो डेबिट यामध्ये अडचणी येऊ शकतात. याचे कारण रिझर्व्ह बँक (RBI) द्वारे लागू करण्यात आलेला नवा नियम आहे.

रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना व्यवहार करताना अधिक सुरक्षा देण्यासाठी ही व्यवस्था केली आगे. मात्र यामुळे मोबाइल, यूटिलिटी किंवा अन्य यूटिलिटी बिलासाठी ऑटो पेमेंट, ओटीटीचे सब्सक्रिप्शन चार्ज, रेंटल सर्व्हिस इत्यादीसाठी तुमच्या अकाउंटमधून दर महिन्याला आपोआप कापल्या जाणाऱ्या रक्कमेच्या व्यवस्थेत सुरुवातीला काही अडचणी येण्याची शक्यता आहे.

दुहेरी सुरक्षा

रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमात म्हटले गेले आहे की पेमेंटसाठी एक अतिरिक्त सुरक्षेची भींत असणं आवश्यक आहे. म्हणून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय किंवा प्रीपेड इंस्ट्रुमेंट मधून आपोआप कापली जाणारी इएमआय किंव रेंटलसाठी आता एक अतिरिक्त सिक्युरिटी लेअर असेल.

रिझर्व्ह बँकेने गेल्या ऑगस्ट 2019 मध्ये जारी करण्यात आलेल्या एका नोटिफिकेशनमध्ये बँकांना सांगितले होते की, अशा प्रकारची एक व्यवस्था बनवली पाहिजे आणि 1 एप्रिल, 2021 पासून ती व्यवस्था कार्यान्वित केली पाहिजे.

नोटिफिकेशनमध्ये रिझर्व्ह बँकेने सांगितले होते की, अनेकांकडून ही मागणी आहे की कार्डमधून पहिल्यांदा पेमेंट किंवा दर महिन्याला होणाऱ्या ऑटो पेमेंटसाठी एका ई-मँडेटची व्यवस्था करण्यात यावी म्हणजेच ग्राहकांची परवानगी मागण्याची एक व्यवस्था करण्यात यावी.

म्हणजे आता ऑटोमॅटिक ट्रांझॅक्शन होत असताना त्यांना पहिल्या अॅडिशनल फॅक्टर ऑफ ऑथेंटिकेशन (AFA) जावे लागेल, दरवेळी असे करण्यात येईल. म्हणजे प्रत्येक महिन्याला जेव्हा ऑटो पेमेंट होणार असेल त्या आधी ग्राहकांना एक वन टाइम पासवर्ड (OTP) पाठवण्यात येईल.

रिझर्व्ह बँकेने 5,000 रुपयांपर्यंत डेबिट कार्ड पेमेंट विना स्वाइप करता परवानगी दिली आहे. त्यामुळे अशा पेमेंटना एएफएमधून सूट देण्यात आली आहे. म्हणजे असे पेमेंट विना ओटीपी होतील. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, ‘1 एप्रिल 2021 पासून कार्ड/पीपीआय/यूपीआयचे सर्व रिकरिंग ट्रांझॅक्शन कोणत्याही नव्या व्यवस्थेशिवाय होतील.’

कसे लागू होणार

दुहेरी सुरक्षा म्हणजे हे की बँक आणि पेमेंट प्लॅटफॉर्म आपल्या ग्राहकांना पहिले ऑटोमेटिक पेमेंट कापण्याआधी 24 पहिलेच सूचना पाठवेल. याच वेळी ग्राहकांनी कम्युनिकेशनचे माध्यम निवडायचे आहे की मेसेज किंवा ई-मेल कशाने पुढे होणाऱ्या रिकरिंग ट्रांझॅक्शनसाठी ई-मँडेट देऊ इच्छिता. पुढे देखील ग्राहकांच्या मंजूरीशिवाय असे पेमेंट करता येणार नाही.

काय आहेत अडचणी

अद्याप सर्व बँका यासाठी तयार झालेल्या नाहीत आणि त्यांनी ग्राहकांना सूचना पाठवलेल्या नाहीत. त्यामुळे सुरुवातीला कदाचित ग्राहकांना पैसे मॅन्युअली भरण्याची वेळ येऊ शकते.