पहिल्यांदा कार खरेदी करताय? या 5 गोष्टी ठेवा लक्षात 

2861

हिंदुस्थानात सध्या सणांचा उत्साह सुरू आहे. याच दरम्यान देशात कारची विक्री सर्वाधिक होते. आपणही जर एखादी नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आपण जर पहिल्यांदाच कार खरेदी करणार असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊ काय आहे या गोष्टी.

डिस्काउंट


कार खरेदी करण्याचा विचार करत असला तर हे जरूर लक्षात ठेवा की सध्या फेस्टिव्ह सीझन सुरू आहे. या दरम्यान अनेक कार उत्पादक कंपन्या आपल्या कारवर मोठी सूट देतात. कार खरेदी करताना आपण कार विक्रेत्याकडून कारच्या किमतीवर मिळणारी सूट आणि त्याची टक्केवारी यांबाबत पूर्ण माहिती घ्या.

कार अॅक्सेसरीज


आपण नवीन कार खरेदी करतो तेव्हा कार डील्सर आपल्याला कारसह अनेक प्रकारच्या ‘अॅक्सेसरीज’ ही देतात. यामधील काही अॅक्सेसरीज साठी तुम्हाला पैसे मोजावे लागतात. तर काही अॅक्सेसरीज या कारच्या किमतीमध्ये तुम्हाला मिळतात. कार खरेदी करताना याबद्दल आपल्या विक्रेत्याकडून याची पूर्ण माहिती घ्या.

किंमत


पहिल्यांदाच कार खरेदी करत असल्यास एका शोरूममध्ये जाऊन कारच्या किमतीची माहिती घ्या. तुम्हाला त्या शोरूममध्ये कारची किंमत अधिक वाटल्यास इतर शोरूममध्ये जाऊनही कारच्या किमतीविषयी माहिती घ्या. प्रत्येक शोरूममध्ये कारची किंमत वेगवेगळी असून शकते. असं केल्यास तुम्हाला अधिक फायदा होऊ शकतो.

बजेट


कार खरेदी करण्याआधी आपण आपला एक बजेट तयार करायला हवा. आपल्याला किती किमतीत कोणकोणते फीचर्स असलेली कार हवी याचा एक आराखडा तयार करून ठेवा. जेणेकरून तुम्ही कार खरेदी करण्यास गेल्यावर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही.

कुटुंबासाठी फिट कार

नवीन कार खरेदी करत असला तर आपल्या कटुंबाला ध्यानात ठेवून कार खरेदी करा. उदाहरणार्थ, जर आपले कुटुंब लहान असेल तर मोठी कार आपल्यासाठी अधिक किफायतशीर असू शकत नाही. तसेच जर आपले कुटुंब मोठे असेल तर लहान कारमुळे आपापल्या पुढे जाऊन अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आपण आपल्या कुटुंबाच्या अनुसार निर्णय घ्यावा की कोणत्या सेगमेंटमधली किती सीट असलेली कार आपल्या कुटुंबासाठी फिट आहे.

आपली प्रतिक्रिया द्या