तुमची कार कमी मायलेज देते का? मग फॉलो करा ‘या’ टिप्स  

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे मायलेजचे महत्व अधिक वाढले आहे. सर्व कार चालकांना आपल्या कारने अधिक मायलेज द्यावे असे वाटते. मात्र अनेक वेळा कंपनीने केलेल्या दाव्यापेक्षा कार कमी मायलेज देते. जर तुमच्यासोबतही असच काहीस घडत असेल तर, आज आम्ही तुम्हाला कारचे मायलेज वाढवण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊ काय आहेत या टिप्स…

नियमित कारची सर्व्हिस करा 

कारचे आयुष्य वाढविण्यासाठी कारची नियमित सर्व्हिस करावी. याने कारचे आयुष्य वाढवते आणि कारचे मायलेज देखील. जर आपण बऱ्याच काळापासून कारची सर्व्हिस केली नसेल तर लवकरात लवकर करा.

वारंवार गियर बदलणे

कारचे गियर वारंवार बदलत राहिल्यास याचा कारचा मायलेजवर प्रभाव पडतो आणि कारचे मायलेज कमी होते. जर तुम्ही वारंवार कारचे गियर बदलाचे टाळले तर कार अधिक मायलेज देऊ शकते.

सिग्नलवर गाडी बंद करा

अनेक जण सिग्नलवर गाडी थांबली तरी त्याचे इंजिन सुरु ठेवतात. अशातच गाडी थांबलेल्या वेळीही इंजिन सुरु असल्याने इंधन वापरते जाते. यामुळे कारचा मायलेज आणखीन कमी होतो. म्हणूनच आपण जेव्हा सिग्नलवर थांबता त्यावेळी कारचे इंजिन बंद करा.

आपली प्रतिक्रिया द्या