
हिंदुस्थानातील अनेक वाहन उत्पादक कंपन्या बाजारात इलेक्ट्रिक वाहने आणण्यावर भर देत आहेत. अशातच आता एक बॅटरी उत्पादक कंपनीही इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात उतरण्यास सज्ज झाली आहे. ‘एक्साइड’ या बॅटरी उत्पादक कंपनीने हिंदुस्थानात बुधवारी आपली इलेक्ट्रिक रिक्षा ‘एक्साइड-निओ’ लॉन्च केली आहे. एक्साइड इंडस्ट्रियलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम चटर्जी यांनी या बद्दल सांगताना म्हणाले की, ‘ही ई-रिक्षा सुरुवातीला निवडक बाजारपेठेत सादर केली जाणार असून, टप्प्याटप्प्याने ही देशभरात लॉन्च केली जणार आहे.’
ब्रँडचा विचार करता ‘एक्साइड’ ही देशातील बॅटरी उत्पादक कंपनी आहे. या क्षेत्रात त्यांनी अनेक उत्पादने सादर केली आहेत. एक्साईड इंडस्ट्रीजचे डेप्युटी जनरल मॅनेजर सुबीर चक्रवर्ती म्हणाले, ई-रिक्षाच्या क्षेत्रात जबरदस्त वृद्धी झाली असली तरी अद्याप या क्षेत्रात कोणत्याही इतर वाहन उत्पादक कंपनीने पाऊल ठेवलेले नाही आहे.
दरम्यान, दुचाकी उत्पादक कंपनी बजाजनेही बुधवारी आपली इलेक्ट्रॉनिक स्कुटर Bajaj Chetak बाजारात लॉन्च केली आहे.

























































